Cancer : तुम्हाला कॅन्सर झालाय का ते 15 सेकंदात समजणार, DermaAId अॅपच्य माध्यमातून 50 त्वचा रोगांचे निदान होणार
Skin Disease Diagnose: आखिल भारतीय आर्युर्विज्ञान संस्था (AIMS) ने एक अॅप लॉन्च केलं असून त्या माध्यमातून 50 वेगवेगळ्या त्वचा रोगांचे निदान होणार आहे.
नवी दिल्ली: आता तुम्हाला कॅन्सर झाला आहे का ते केवल 15 सेकंदात समजणार आहे. आखिल भारतीय आर्युर्विज्ञान संस्था (AIMS) अर्थात एम्सने 'डर्माएड' (DermaAId) नावाचे एक अॅप लॉन्च केलं असून त्या माध्यमातून कॅन्सरसहित 50 वेगवेगळ्या त्वचा रोगांचे निदान होणार आहे.
कॅन्सर हा एक असा आजार आहे की त्यावर कोणतेही कायमस्वरुपी इलाज नाही. हा जीवघेणा आजार हळूहळू शरिरातील पेशी नष्ट करतात आणि नंतर त्यामुळे वेगवेगळे अवयव निकामी होतात. या आजाराचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार करता येतात. पण अनेकांना आपल्याला कॅन्सरची लागण झाली की नाही हेच समजत नाही. त्यामुळे त्यांच्यावर योग्य वेळी उपचार होत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता आखिल भारतीय आर्युर्विज्ञान संस्थेने 50 प्रकारच्या त्वचा रोगांसंबंधीत निदान होण्यासाठी 'डर्माएड' (DermaAId) हे अॅप सुरू केलं आहे.
आखिल भारतीय आर्युर्विज्ञान संस्था आणि दिल्लीतीर न्यूरिथम लॅब स्टार्ट अप या संस्थेचा हा संयुक्त उपक्रम आहे. हे अॅप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड केलं जाऊ शकतं. या अॅपच्या माध्यमातून 15 ते 30 सेकंदात त्वचा आणि तोंडाच्या कॅन्सरचे निदान होऊ शकतं. तसेच त्वचेसंबंधी इतरही अनेक आजारांचे निदान केलं जाऊ शकतं.
हे अॅपमध्ये आर्टिफिशिअल अल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे बेसिक स्मार्टफोनदेखील एक पॉवरफुल स्किनकेअर टूलमध्ये रुपांतरित होऊ शकतं. या अॅपच्या माध्यमातून डॉक्टर रुग्णाच्या शरीरातील जखमेचा फोटो घेतात आणि त्याला क्लाऊड सर्व्हरवर अपलोड करतात. त्यानंतर 15 ते 30 सेकंदामध्ये त्याचे विश्लेषण करण्यात येतं.
महत्त्वाच्या बातम्या:
- Coronavirus : महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा स्ट्रेन धोकादायक : एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
- Monkeypox: अमेरिकेसह अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा प्रसार, हा आजार किती धोकादायक, कसा बचाव कराल?
- Hepetitis B : 'हेपटायटिस बी' वर मात करण्यासाठी अॅबॉटकडून भारतात नवीन चाचणी किट; जाणून घ्या काय आहे हा आजार