Coronavirus : महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा स्ट्रेन धोकादायक : एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया
नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं आणखी कठीण असल्यांचं ते म्हणाले आहेत. तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्याताही डॉ. गुलेरीया यांनी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात आढळलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचं मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी व्यक्त केल आहे. या नव्या स्ट्रेनमुळे हर्ड इम्युनिटी मिळवणं आणखी कठीण असल्यांचं ते म्हणाले आहेत. तर यापूर्वी कोरोनाच्या अँटीबॉडी तयार झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्याताही डॉ. गुलेरीया यांनी व्यक्त केली आहे.
कोरोनावरील लस ही नव्या स्ट्रेन विरोधात पुर्णपणे प्रभावी नाही. मात्र, करोना लसीकरणामुळे नव्या स्ट्रेनच्या प्रसारावर काही प्रमाणात रोख लावता येईल, असंही ते म्हणाले आहेत. माहितीनुसार भारताता आतापर्यंत कोरोनाचे 240 नवीन स्ट्रेन आढळले आहे.
कोरोनाचा नवीन स्ट्रेन हा कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येचे मुख्य कारण आहे. गेल्या आठवड्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दोन शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा नवीन स्ट्रेन यवतमाळ, अकोला आणि विदर्भातील काही भागात आढळून आला आहे.
कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी म्हणाले, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यापाठीमागे कोरोनाचा नवीन स्ट्रेन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यासा सुरुवात करण्यात आली असून उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
राज्यातील कोरोना वाढतोय राज्यामध्ये या आठवड्यापासून कमी होत असलेला कोरोनाचा आकडा पुन्हा वाढताना दिसत आहे. काल, शनिवारी राज्यात 6281 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर 2567 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 19,92,530 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.16 % एवढे झाले आहे.