Ahmedabad Air India Plane Crash: अहमदाबाद-लंडन बोईंग विमान अवघ्या दोन मिनिटात टेक ऑफ करताच बेचिराख; 50 जणांचे मृतदेह हाती
Ahmedabad Air India Plane Crash: एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-171 दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी वाजता उड्डाण केले. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी अवघ्या दोन मिनिटात कोसळले.

Ahmedabad Air India Plane Crash: एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलायनर विमान अहमदाबादमध्ये कोसळले आहे. त्यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह 242 प्रवासी होते. विमान लंडनला जात असताना, टेकऑफ दरम्यान विमानतळाच्या सीमेजवळ त्याचा स्फोट झाला. एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय-171 दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी वाजता उड्डाण केले. दुपारी 1 वाजून 40 मिनिटांनी अवघ्या दोन मिनिटात कोसळले. विमानतळ कॅम्पसला लागून असलेल्या एअर कस्टम कार्गो ऑफिसजवळ विमान कोसळले. विमान पडताच संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसले. विमान अपघाताचा शेवटचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आगीच्या ज्वाळा हवेत पसरल्याचे दिसून येत आहे.
तांत्रिक बिघाडामुळे अपघात
प्राथमिक अहवालानुसार, विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाला. तथापि, अद्याप याबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही. माहितीनुसार, एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून लंडनला जात होते.उड्डाणाच्या वेळी ते विमानतळाच्या भिंतीला धडकले आणि आग लागली. प्राथमिक वृत्तानुसार, गुजरातच्या मेघानी भागात हा अपघात झाला. विमान अहमदाबादहून लंडनला जात होते.
#EXCLUSIVE: अहमदाबाद में बड़ा विमान हादसा, लंदन जा रहा एअर इंडिया का प्लेन टेक ऑफ के तुरंत बाद क्रैश!
— Shivam Pratap Singh (@journalistspsc) June 12, 2025
गुजरात के पूर्व CM विजय रुपाणी भी फ्लाइट में सवार थे, गृह मंत्री अमित शाह ने CM और कमिश्नर से फोन पर बात की!!#planecrash #airindia #एयरइंडिया #Ahmedabad #Gujrat #VideoViral pic.twitter.com/ny24JK4rYr
विमानाच्या ढिगाऱ्यातून 50 मृतदेह बाहेर काढण्यात आले
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत विमानाच्या ढिगाऱ्यातून 50 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मदत आणि बचाव कर्मचारी आग विझवण्याचे काम करत आहेत. ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमी आणि मृतांचा शोध घेत आहेत.
We are following reports of a crash of Air India flight #AI171 from Ahmedabad to London. We received the last signal from the aircraft at 08:08:51 UTC, just seconds after take off.
— Flightradar24 (@flightradar24) June 12, 2025
The aircraft involved is a Boeing 787-8 Dreamliner with registration VT-ANB… pic.twitter.com/EmKKISJldF
सुरत आणि वडोदरा येथून मदत पथके रवाना
दुर्घटनेनंतर, वडोदरासह अहमदाबादहून 25 अग्निशमन दलाच्या गाड्या अहमदाबादला पाठवण्यात आल्या आहेत. सुरतहून मदत आणि बचाव पथकेही अहमदाबादला पाठवण्यात आली आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेन पटेल सुरतहून अहमदाबादला रवाना झाले आहेत. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांच्या अनेक पथकांनाही विमानतळावर पाठवण्यात आले आहे. अपघातानंतर गृहमंत्री शाह यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी चर्चा केली आणि अपघाताची चौकशी केली.
इतर महत्वाच्या बातम्या























