Agni Prime Missile : भारताकडून आणखी एका आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, 'अग्नि प्राईम' शत्रूचे अनेक अड्डे उद्धवस्त करण्यास सक्षम
DRDO Ballistic Missile Test : DRDO द्वारे आधुनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नि प्राइम'ची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.
Agni Prime Missile Test : भारतीनं आणखी एक यशस्वी भरारी घेतली आहे. भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defence Research and Development Organisation) म्हणजेच डीआरडीओ (DRDO) 'अग्नि प्राइम' (Agni Prime) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. या क्षेपणास्त्राला अग्नि-पी (Agni P) असंही म्हटलं जातं. DRDO कडून 'अग्नि प्राइम' या न्यू जनरेशन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची (New Generation Ballistic Missil) यशस्वी चाचणी करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. या क्षेपणास्त्रामध्ये एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्धवस्त करण्याची क्षमता आहे.
अग्नि प्राईम बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
ओडिशाच्या किनार्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून 'अग्नि प्राइम' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने निवेदनात ही माहिती दिली आहे. प्रणालीची अचूकता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी अग्नि प्राइम क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी विकासात्मक चाचण्यांनंतर वापरकर्त्यांनी प्री-इंडक्शन नाईट लाँच केलं. DRDO ने बुधवारी रात्री 7:40 वाजता अब्दुल कलाम बेटावरील लॉन्चिंग कॉम्प्लेक्स 4 वरून अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
New Generation Ballistic Missile Agni Prime was successfully flight tested by DRDO on 7th June at around 7:30 pm from Dr APJ Abdul Kalam Island off the coast of Odisha. During the flight test, all objectives were successfully demonstrated. pic.twitter.com/aG2g4FEEXs
— ANI (@ANI) June 8, 2023
एकाच हल्ल्यात शत्रूचे अनेक अड्डे उद्धवस्त
संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) द्वारे 7 जून रोजी नवीन पिढीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'अग्नि प्राइम'ची यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आली. डॉ. ए.पी.जे. ओडिशातील अब्दुल कलाम बेटावरून या नवीन पिढीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज हे मिसाईल लक्ष्याला पूर्णपणे उदध्वस्त करण्यास सक्षम आहे.
अग्नि प्राइम क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये
- 11000 किलो वजनाच्या या क्षेपणास्त्रात 2000 किमी अंतरापर्यंतच्या कोणत्याही लक्ष्याला लक्ष्य करण्याची क्षमता आहे.
- 34.5 फूट लांबीच्या क्षेपणास्त्रावर एक किंवा अनेक स्वतंत्रपणे टार्गेटेबल रीएंट्री व्हेईकल (MIRV) वॉरहेड्स बसवता येतात.
- या क्षेपणास्त्राद्वारे अनेक लक्ष्यांवर हल्ला केला जाऊ शकतो. हे क्षेपणास्त्र उच्च-तीव्रतेची स्फोटक आणि आण्विक शस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे.
- अग्नि प्राइम हे दुसऱ्या टप्प्यातील क्षेपणास्त्र आहे. यामध्ये 1500 किलो ते 3000 किलो वजनाची शस्त्रे बसवता येतात. हे स्टेज-2 मधील रॉकेट मोटर आधारित क्षेपणास्त्र आहे.
'अग्नि' उपक्रमाअंतर्गत विविध क्षेपस्त्रांची निर्मिती
अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज असलेल्या अग्नि प्राइम क्षेपणास्त्राने आपले लक्ष्य पूर्णपणे नष्ट करण्यात यश मिळवलं आहे. हे क्षेपणास्त्र 'अग्नि' मालिकेतील (Agni Missile Series) आधुनिक, मारक, अचूक आणि मध्यम पल्ल्याच्या अणुऊर्जेवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. भारताने 'अग्नि' उपक्रमाअंतर्गत विविध प्रकारची क्षेपणास्त्रांची निर्मिती केली आहे.