India-China Face Off | चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद
चीनसोबत हिंसल चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. तर चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत, असं एएनआयने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : चीनने सवयीप्रमाणे पुन्हा एकदा भारतासोबत गद्दारी केली आहे. भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत 20 भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने ही माहिती दिली आहे. 15 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही 43 जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.
Indian intercepts reveal that Chinese side suffered 43 casualties including dead and seriously injured in face-off in the Galwan valley: Sources confirm to ANI pic.twitter.com/xgUVYSpTzs
— ANI (@ANI) June 16, 2020
आज सकाळी भारत -चीन सीमेवरील हिंसक झडपेत कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष बाबू, जवान पलानी, कुंदन ओझा यांना वीरमरण आल्याचं समोर आलं होतं. चीनच्या या हल्ल्यात एकूण 20 जवान जखमी झाले होते. त्यापैकी 3 जवान सुरुवातीला शहीद झाले होते, मात्र आता लष्कराने दिलेल्या माहितीनुसार भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत.
Army statement says 17 of 20 soldiers dead were critically injured in line of duty at stand-off location, exposed to sub-zero temperatures
— Press Trust of India (@PTI_News) June 16, 2020
नेमका काय वाद आहे?
India-China Border Tension गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण, भारताच्या प्रत्युत्तरात चीनचे 43 सैनिक मारले गेल्याची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
