एक्स्प्लोर
Advertisement
बिहारमध्ये राजदला भोपळा, लालू यादवांनी एकवेळचे जेवण सोडले, रुग्णालयात उपचार सुरु
लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकला आली नाही. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी जेवण बंद केले आहे.
रांची : लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकला आली नाही. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी एक वेळचे जेवण बंद केले आहे. त्यामुळे त्यांची तब्येक खालावली आहे. परिणामी त्यांना रांची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रांची येथील RIMS रुग्णालयात लालूंवर उपचार सुरु आहे. RIMS मधील डॉक्टरांनी सांगितले की, लालूंनी जेवण करणे सोडल्यामुळे त्यांची तब्येत अधिकच खालावत आहे. लालू सकाळी आणि त्यानंतर थेट रात्री जेवण करतात. मधल्या काळात ते जेवण करण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांना इन्सुलिन देण्यात आम्हाला अडचणी येत आहेत. दरम्यान राजदचे नेते म्हणाले की, निवडणुकीदरम्यान लालू आमच्यासोबत असते तर कदाचित निवडणुकीचे निकाल वेगळे आले असते.
लोकसभा निवडणुकीत लालूंच्या राजदला खातेदेखील उघडता आलेले नाही. बिहारमधील लोकसभेच्या 40 पैकी 39 जागांवर भाजपला विजय मिळाला आहे तर 1 जागा काँग्रेसने जिंकली आहे. राजदने बिहारमध्ये काँग्रेस, आरएलएसपी, हम (एस) आणि इतर लहान-मोठ्या पक्षांसोबत युती केली होती. तरिदेखील त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement