एक्स्प्लोर

'गो कोरोना गो' नंतर आता आठवलेंचा नवा नारा 'नो कोरोना, कोरोना नो'

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आधी 'गो कोरोना, कोरोना गो' असा नारा दिला होता. त्याची चर्चा सबंध देशात झाली होती. आता त्यांनी नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर एक नवा नारा दिलाय, 'नो कोरोना, कोरोना नो'

नवी दिल्ली: कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात त्याला हद्दपार करण्यासाठी 'गो कोरोना, कोरोना गो' असा नारा देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या धोक्याची छाया जगावर पसरत असताना एक नवीन नारा दिलाय, 'नो कोरोना, कोरोना नो.' नव्या कोरोना स्ट्रेनचा भारतात शिरकाव होऊ नये यासाठी हा नारा दिल्याचं रामदास आठवले यांनी सांगितलंय.

काय आहे नवा स्ट्रेन? ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. तो मूळच्या कोरोनापेक्षा 70 टक्के अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे काळजी म्हणून भारतासह अनेक देशांनी ब्रिटनसोबतच्या आपल्या विमानसेवांना स्थगिती दिली आहे. आता अशा प्रकारचा दुसरा स्ट्रेन दक्षिण आफ्रिकेतही सापडला आहे. त्यामुळे जगासमोरची डोकेदुखी वाढली आहे.

जपानने यावर कडक पाऊले उचलत सर्व विदेशी नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध घालण्याची घोषणा केली आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनला प्रतिबंध घालण्यासाठी कडक पाऊले उचलली जात आहेत. त्यामध्ये गेल्या महिन्याभरात ब्रिटनवरुन भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती घेण्याचं सुरु असून त्यांची पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

यासंबंधी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नवी नियमावली जाहीर केली असून त्यानुसार नियोजन केलं जात आहे. 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या 4 आठवड्यांच्या दरम्यान ब्रिटनहून भारतातील विविध राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांची माहिती घेण्याचे निर्देश ब्युरो ऑफ इमिग्रेशनला देण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन या प्रवाशांची माहिती संबंधित राज्यांना देणार आहे. 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान भारतात आलेल्या प्रवाशांची माहिती जिल्हा सर्व्हेक्षण अधिकाऱ्यांमार्फत घेण्यात येईल. अशा प्रवाशांमध्ये काही लक्षणं दिसत असतील तर त्यांची RT-PCR चाचणी घेण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक

ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 

भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार

'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा

Embed widget