(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cheetah : तब्बल 70 वर्षांनंतर भारतीयांना होणार चित्त्याचे दर्शन, केंद्र सरकारकडून कृती आराखडा तयार
Cheetah : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यान चित्त्याच्या अधिवासासाठी योग्य ठिकाण मानले जाते.
मुंबई : जवळपास 70 वर्षांनंतर भारतातील जंगलात चित्ता (Cheetah) परत येणार आहे. पुढील पाच वर्षात देशातील विविध राष्ट्रीय उद्यानांमध्ये 50 चित्ते दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणले जाणार आहे. सुरुवातीला देशात आठ ते दहा चित्त्यांच्या जोड्या आणल्या जाणार आहे.
मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात तो आणण्यात येणार आहे. मध्यप्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यान चित्त्यांच्या अधिवासाकरीता आणि शिकारासाठी योग्य आहे. तसेच या राष्ट्रीय उद्यानात 21 चित्ते टिकवण्याची क्षमता आहे. कुनो परिसरातून गावांचे संपूर्ण स्थलांतर करण्यात येणार आहे. तसेच प्राण्यांसाठी मानवविरहीत अधिवासाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे कुनोमध्ये येत्या काही वर्षात वाघ, सिंह, बिबट्या आणि चित्ता एकाच वेळी बघता येणार आहे.
जगातील सर्वात वेगाने धावणाऱ्या या प्राण्याला भारतीय सरकारने नामशेष म्हणून घोषित केले होते. स्वातंत्र्यपूर्व काळातील शिकारीमुळे भारतातून चित्ता नष्ट झाला होता. भारतातून चित्ता पूर्णपणे नामशेष झाल्याचे अधिकृतरित्या घोषित केल्यानंतर जवळजवळ सात दशकानंतर अफ्रिकेतून चित्ता भारतात आणण्यात येणार आहे.
चित्ता पृथ्वीवर सर्वात वेगाने धावणारा प्राणी आहे. मागील अनेक वर्षांपासून चित्ताला भारतात आणण्यासाठी वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया आणि केंद्राकडून प्रयत्न आहे. चित्त्यांचा मानवासोबतच्या संघर्षाचे कमी उदाहरणं समोर आले आहे. सोबतच चित्ते मानवांसाठी धोकादायक नाहीत आणि आपल्यापेक्षा मोठ्या प्राण्यांवर हल्ले देखील करीत नाहीत.
छत्तीसगडमधील महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी केली होती शेवटची शिकार
छत्तीसगडमधील कोरिया जिल्ह्यातील महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांनी 73 वर्षापूर्वी एका वयस्कर चित्त्याची शिकार केली होती. शिकार केल्यानंतर त्यांनी हे फोटो बॉम्बे नॅचरल हिस्ट्रीला शिकारीचे फोटो पाठवले होते. 1947 साली महाराजा रामानुज प्रताप सिंहदेव यांचा चित्त्याच्या शिकारीसोबतचा फोटो हा शेवटचा फोटो समजला जातो. त्यानंतर 1952 साली भारतीय सरकारने अधिकृतपणे चित्त्यास नामशेष म्हणून घोषित केले होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Maharashtra Tiger Deaths: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात 23 वाघांचा मृत्यू