एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन : वाघ बघायचाय.. 'या' जंगलांचा आहे पर्याय?

वाघांना नष्ट होत चालेल्या वन्यप्राण्यांच्या प्रजातींच्या यादीमध्ये ठेवले गेले आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी 'वाघ वाचवा' यासारखी राष्ट्रीय मोहीम राबविली जाते आहे.

मुंबई : संपूर्ण जगभरात 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन साजरा करण्यामागचा उद्देश, हेतू म्हणजे वाघांचे संवर्धन व्हावं आणि त्यांचे नैसर्गिक निवासस्थान ज्यावर हळुहळु मानवाकडून अतिक्रमण केलं जातंय ते अबाधित राहवं.

वाघांना नष्ट होत चालेल्या वन्यप्राण्यांच्या प्रजातींच्या यादीमध्ये ठेवले गेले आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी 'वाघ वाचवा' यासारखी राष्ट्रीय मोहीम राबविली जाते आहे. व्याघ्र संवर्धनाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि वाघांच्या घटणाऱ्या संख्येविषयी जागरूक होण्यासाठी 2010 मध्ये रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे एक परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.  यामध्ये 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

भारतात वेगवेगळ्या राज्यात मोठ्या प्रमाणात वाघांची अभयारण्ये आहेत. जर तुम्हाला वाघ पाहण्याची आवड असेल, तर, तुम्ही या व्याघ्र प्रकल्पांना भेट देण्याची योजना करू शकता.

देशातील 5 प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प कोणते ते जाणून घ्या-

जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, उत्तराखंड

हिमालयच्या पायथ्याशी वसलेला जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प हा भारतातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. 500 चौरस किलोमीटरच्या विस्तृत क्षेत्रात पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1936 मध्ये झाली होती. उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेटमध्ये हिरव्यागार जंगलात मोजकेच वाघ आज आहेत. याठिकाणी तुम्ही जंगलात आकर्षक अशी जंगल सफारी किंवा रोमांचकारी प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प, राजस्थान

कधीकाळी जयपूरच्या महाराजांचे शिकारी मैदान असणारे रणथंबोर हे आज भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे. जवळपास 1 हजार 134 चौ.कि.मी. क्षेत्रात हे जंगल पसरलेले असून या ठिकाणी वाघांची संख्या मोठी आहे. विशेषतः बंगाल टायगर्सचं निवासस्थान म्हणून हे ओळखले जातं. वाघाच्या व्यतिरिक्त याठिकाणी आपल्याला येथे इतर वन्यप्राण्यांच्या प्रजाती देखील पाहायला मिळतात. ज्यात अस्वल, कोल्हा आणि जॅकल आहेत.

बांधवगड व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश

बांधवगड व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांच्या यादीत उच्च स्थानी आहे. इथे दररोज हजारो पर्यटक येत असतात.. या ठिकाणी कमालीची गोष्ट म्हणजे रॉयल बंगाल टायगर्यस. 820 चौरस किमी अंतरावर पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानात प्राचीन बांधवगड किल्ला आहे. जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य आणि तेजस्वी इतिहासासह बांधवगड व्याघ्र प्रकल्प आकर्षित करत असतो.

पेरियार व्याघ्र प्रकल्प, केरळ

जर तुम्हाला केरळमध्ये चित्तथरारक सौंदर्य आणि आश्चर्यकारक वन्यजीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर पेरियार टायगर रिझर्व आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हा भारतातील प्रसिद्ध वाघ प्रकल्प असून या ठिकाणी बंगालचा वाघ, पांढरा वाघ, आशियाई हत्ती, वन्य डुक्कर आणि सांबार यांची मोठी संख्या आहे. सुमारे 777 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे जंगल पसरलं आहे. यामध्ये प्राण्यांसाठी काही कृत्रिम तलावदेखील बांधला असून तो जंगलाच्य सौंदर्यात आणि मोहकतेत भर घालतो आहे.

सुंदरबन व्याघ्र प्रकल्प, पश्चिम बंगाल

सुंदरबन टायगर रिझर्व्ह हा जागतिक वारसा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि त्यात रॉयल बंगाल टायगरचं स्थान हे महत्त्वाचे आहे. या व्याघ्र प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जलचर सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी यांच्यासह मोठ्या संख्येने लुप्तप्राय प्रजाती आहेत. तथापि, देशातील बहुतेक राष्ट्रीय उद्यानांप्रमाणेच, सुंदरबनमध्ये जीप सफारी नाहीत. त्याऐवजी आपल्याला आजूबाजूच्या भागासाठी वाहतुकीसाठी आणि पर्यटनासाठी बोट घ्यावी लागते.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget