Maharashtra Tiger Deaths: चिंताजनक! महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात 23 वाघांचा मृत्यू
Tiger Deaths In Maharashtra: महाराष्ट्रात सहा महिन्यांत 23 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत राज्यात 23 वाघांचा मृत्यू झालाय.
Tiger Deaths: महाराष्ट्रात सहा महिन्यांत 23 वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. जानेवारी 2021 ते जुलै 2021 या कालावधीत राज्यात 23 वाघांचा मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वाघांपैकी 15 वाघांचा नैसर्गिक कारणानं, चौघांचा विषाच्या वापरामुळं, दोघांचा शिकारीमुळं, एका वाघाचा रेल्वे अपघातामुळं आणि एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची नोंद आहे. या 23 वाघांपैकी 15 प्रौढ वाघ हो. तर, आठ त्यांचे शावक होते. दरम्यान, जानेवारी ते सप्टेंबर महिन्यात वाघांनी माणसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्यात. या कालावधीत वाघाच्या हल्ल्यात 39 जणांनी प्राण गमावले आहेत.
वाघांमुळं माणसांच्या मृत्यूच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लेखी उत्तर दिलंय. म्हणाले की, "1 जानेवारी ते 30 सप्टेंबर या कालावधीत राज्यात मानव-प्राणी संघर्षामुळं 65 जणांचा मृत्यू झालाय. या 65 मृत्यूंपैकी 39 मृत्यू हे फक्त वाघांच्या हल्ल्यात झाले आहेत. दरम्यान, मागील वर्षी 1 जानेवारी 2020 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत वाघाच्या हल्ल्यात 31 लोकांचा मृत्यू झालाय".
15 लाख भरपाई
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 15 लाखांची मदत दिली जाते, असं राज्य सरकारनं लेखी उत्तरात म्हटलंय.
महाराष्ट्रातील पेंच येथे सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी असूनही 2010 मध्ये भारतातील वाघ नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचलं होतं. भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प नागार्जुन सागर श्रीशैलम आहे. तर, देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पेंच येथे आहे. 29 जुलै रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन' साजरा केला जातो.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-