Aero India | बंगळुरुमध्ये होणार संरक्षण दलाचा सर्वात मोठा 'एअरो इंडिया शो'
बंगळुरुमध्ये फेब्रुवारी महिन्यात 3 ते 5 तारखेच्या दरम्यान संरक्षण दलाचे (Defence) सर्वात मोठे प्रदर्शन 'एअरो इंडिया शो' (Aero India) आयोजित करण्यात येत आहे. गेल्या वेळच्या प्रदर्शनात पार्किंग लॉटमध्ये आग लागल्याचा प्रकार घडला होता.
बंगळुरु: संरक्षण दलाचे सर्वात मोठे प्रदर्शन 'एअरो इंडिया शो' चे आयोजन तीन ते पाच फेब्रुवारीच्या दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. संरक्षण दलाचे हे सर्वात मोठे प्रदर्शन असून ते दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतं. कोरोना काळातील अनेक अडचणींवर मात करुन याचे यशस्वी आयोजन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या वेळच्या एअरो शो मध्ये पार्किंग लॉटमध्ये आग लागल्याने अनेक गाड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे या वेळी तशा प्रकारचा कोणताही अपघात होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.
Indian Army Day 2021 | दरवर्षी 15 जानेवारीला का साजरा केला जातो सैन्य दिवस? या दिवसाचं महत्व काय?
संरक्षण दलाचा एअरो शो हा कार्यक्रम दर दोन वर्षांनी आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये देश-विदेशातील मोठ्या कंपन्या भाग घेतात. या वर्षी आयोजित करण्यात आलेला एअरो शो हा हायब्रिड स्वरुपाचा असेल. त्यामध्ये ऑनलाइन तसेच ऑफलाइन या दोन्ही पध्दतीने भाग घेता येणार आहे. जे लोक प्रत्यक्षात या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांना ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शोमध्ये 42 भारतीय एअरक्राफ्ट भाग घेणार या एयर शोमध्ये 42 भारतीय एअर क्राफ्ट भाग घेणार आहेत. ज्यामध्ये Mi-17 V5, ALH, LCH, LUH, C-17, Embraer, AN-32, Jaguar, Hawk, Su-30, LCA, Rafale आणि Dornier या एअर क्राफ्टचा समावेश आहे. विशेष म्हणजे या वर्षी सुर्यकिरण आणि सारंग एरोबेटिक डिस्प्ले एकसोबत होणार आहेत. त्याचबरोबर परशुराम एअरक्राफ्ट या शोमध्ये भाग घेणार आहे. तसेच काही विदेशी एअर क्राफ्टचा देखील यामध्ये समावेश आहे.
खिलाडी अक्षय कुमारकडून अनोख्या पद्धतीने सैन्य दिन साजरा, व्हिडीओ पाहा
पाच दिवसांवरुन तीन दिवसांवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशी एअर क्राफ्टच्या समावेशावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये दिवसातून दोनवेळा एअर डिस्प्ले असेल. कोरोनाचा काळ लक्षात घेता नेहमी पाच दिवसांचा असलेला हा कार्यक्रम या वर्षी तीन दिवस असेल असे सांगण्यात आलं आहे.
गेल्या वेळी 2019 साली या शोचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पार्किंगच्या ठिकाणी आग लागल्याने शेकडो गाड्या जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे या वेळी तशा प्रकारचा अपघात होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सुरक्षा आणि मेडिकल सुविधांवर विशेष ध्यान दिलं जात आहे.
India China Border Dispute: चिनी सैनिकाचा भारतीय हद्दीत प्रवेश; भारतीय लष्कराने घेतलं ताब्यात