खिलाडी अक्षय कुमारकडून अनोख्या पद्धतीने सैन्य दिन साजरा, व्हिडीओ पाहा
सैन्य दिन (Army Day) दरवर्षी 15 जानेवारीला साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल के.एम. कैरियप्पा स्वतंत्र भारताचे पहिले सैन्य प्रमुख झाले होते.
भारतीय सेना शुक्रवारी आपला 73वा लष्करी दिन साजरा करीत आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही (Akshay Kumar) आर्मी डे साजरा केला. अक्षयने सैन्याच्या जवानांसमवेत थोडा वेळ घालवून हा दिवस साजरा केला. या दरम्यान त्याने जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळला.
अक्षयने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे, ज्यात तो जवानांसोबत व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. अक्षयचा हा व्हिडिओ खूपच लाईक केला जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाख 40 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत.
अक्षयने ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, “सैन्य दिनाच्या निमित्ताने आज मॅरेथॉन सुरू करण्यासाठी मला आपल्या देशातील काही शूर योद्ध्यांना भेटण्याची संधी मिळाली. वॉर्म अप करण्यासाठी व्हॉलीबॉल खेळण्यापेक्षा काय चांगले आहे."
Had the pleasure of meeting some of our bravehearts today to flag off a marathon on the occasion of #ArmyDay and what better way to warm up than a quick game of volleyball 😁 pic.twitter.com/PM7vGqr0vo
— Akshay Kumar (@akshaykumar) January 15, 2021
सैन्य दिन दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 रोजी फील्ड मार्शल के.एम. कैरियप्पा स्वतंत्र भारताचे पहिले सैन्य प्रमुख बनले. त्यावेळी भारतीय सैन्यात सुमारे 2 लाख सैनिक होते. त्यापूर्वी हे पद कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर यांच्याकडे होते. त्यानंतर, दरवर्षी 15 जानेवारीला आर्मी डे साजरा केला जातो.
अक्षयने अनेक चित्रपटात आर्मी जवानाची भूमिका साकारली आहे. आगामी काळात अक्षय कुमारचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहेत. यामध्ये सूर्यवंशी, अतरंगी रे, बेल बॉटम, पृथ्वीराज आणि बच्चन पांडे या त्यांच्या चित्रपटांचा समावेश आहे.
2020 मध्ये लक्ष्मी या चित्रपटामध्ये अक्षय दिसला होता, हा चित्रपटा टायटलमुळे वादात अडकला होता. याशिवाय गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अक्षय कुमार अतरंगी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटात सारा अली खान मुख्य स्त्री भूमिका साकारत असून दक्षिणेतील सुपरस्टार धनुषही या चित्रपटाचा एक भाग आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.