एक्स्प्लोर

ABP C Voter Survey: राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये खासदारांना उमेदवारीनं देणं भाजपचा मास्टरस्ट्रोक? सर्वेक्षणाचा धक्कादायक अहवाल

ABP C Voter Survey: आगामी विधानसभा निवडणुकीत खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याची रणनीती भाजपने अवलंबली आहे. एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने याबाबत सर्वेक्षण केले आहे.

मुंबई : पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या (Election) तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान, सी व्होटरने 'एबीपी न्यूज'साठी सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात  मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ निवडणुकीत भाजपच्या (BJP) खासदारांना तिकीट देणं हा भाजपचा मास्टरस्ट्रोक आहे का हा सवाल विचारण्यात आला होता. तर यावर लोकांचं काय म्हणणं ते या सर्वेक्षणातून समोर आलं आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खासदार आणि मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याची रणनीती अवलंबली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक केंद्रीय मंत्री आणि खासदारांना तिकिटे दिली आहेत. दरम्यान, रविवारी (15 ऑक्टोबर) काँग्रेसने छत्तीसगढ, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

जनतेची उत्तरं काय? 

मध्य प्रदेशातील 42 टक्के लोकांनी विधानसभेत खासदारांना तिकीट देण्याच्या भाजपच्या रणनीतीला मास्टरस्ट्रोक म्हटले आहे.त्याच वेळी, 48 टक्के लोकांनी हा मास्टरस्ट्रोक नसल्याचं म्हटलं आहे.  तर 10 टक्के लोक यावर कोणतेही उत्तर देऊ शकले नाहीत.  तर राजस्थानमध्ये  50 टक्के लोकांनी हा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं आहे. तर 39 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. तर यावर 11 टक्के काहीही उत्तर देऊ शकले नाहीत. छत्तीसगढमधील 46 टक्के लोकांनी विधानसभेतून खासदार उभे करण्याच्या भाजपच्या निर्णयाला मास्टरस्ट्रोक म्हटले आहे. तर 40 टक्के लोक भाजपच्या या रणनितीशी सहमत नसल्याचं समोर आलं आहे. तर 14 टक्के लोक यावर आपले मत मांडू शकले नाहीत. 

'या' खासदारांना मिळाली विधानसभेची तिकिटे 

मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने गणेश सिंग, रीती पाठक, राकेश सिंग, उदय प्रताप सिंग, फग्गन सिंग कुलस्ते या खासदारांना तिकीट दिले आहे.तर रेणुका सिंह, गोमती साई, अरुण साओ आणि विजय बघेल हे देखील यावेळी विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहेत.  त्याचवेळी, पक्षाने दिया कुमारी, बाबा बालकनाथ, हंसराज मीना, किरोडीलाल मीणा, भगीरथ चौधरी आणि नरेंद्र कुमार या खासदारांना राजस्थानमध्ये उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टीप - या सर्वेक्षणात 2 हजार 649 लोकांची मते घेण्यात आली आहेत. शनिवार (14 ऑक्टोबर) ते रविवार (15 ऑक्टोबर) दुपारपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणातील त्रुटीचे मार्जिन प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.

हेही वाचा : 

Congress Candidates List : मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि तेलंगणासाठी काँग्रेसकडून पहिली यादी जारी, कमलनाथ, भूपेश बघल यांच्यासह दिग्गजांचा समावेश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Embed widget