'या' अटीवर जवळपास 60 टक्के कर्मचारी कमी पगारात काम करण्यास तयार : Survey
देशातील जवळपास 60 टक्के कर्मचारी कमी पगारातही नोकरी बदलण्यासाठी तयार आहे. यासाठी अट केवळ एक आहे की, कुठूनही काम करण्याची मुभा असावी. म्हणजेच त्यांना घरातून किंवा ऑफिसमधून काम करण्याची मुभा दिली जावी.
मुंबई : कोरोना महामारीमुळे वर्क फ्रॉम होम हे नवीन कल्चर सुरु केलं. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर कंपन्यांपासून कर्मचारी हा नवा ट्रेण्ड आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवण्याचा विचार करत आहेत. असे बरेच कर्मचारी आहे, ज्यांना पूर्णवेळ ऑफिसमध्ये काम करायचं नाही, महत्त्वाचं म्हणजे यासाठी ते पगारात तडजोड करण्यासाठीही तयार आहेत.
एक सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. देशातील जवळपास 60 टक्के कर्मचारी कमी पगारातही नोकरी बदलण्यासाठी तयार आहे. यासाठी अट केवळ एक आहे की, त्यांना कुठूनही काम करण्याची मुभा असावी. म्हणजेच त्यांना घरातून किंवा ऑफिसमधून काम करण्याची मुभा दिली जावी.
Awfis चा सर्वे
को-वर्किंग ऑपरेटर Awfis कडून हा सर्व्हे करण्यात आला. कोविड-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान भारताच्या वर्क इकोसिस्टममध्ये आणखी काय बदल झाले आहेत हे या सर्व्हेतून समोर आलं आहे. हा सर्व्हे 1000 भारतीय वर्किंग प्रोफेशनल्ससोबत करण्यात आला, ज्यात विविध क्षेत्रातील आणि विविध जॉब प्रोफाईल असलेल्या कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
हे सर्वेक्षण मे आणि जून 2021 दरम्यान करण्यात आलं, ज्यात देशातील सात मेट्रो शहरांचील प्रोफेशनल्सनी सहभाग घेतला होता.
ऑफिसमधून काम सहजरित्या होतं असं 71 टक्के जणांचं मत
Awfis च्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, ऑफिसमध्ये राहून टीम मॅनेज करणं सोपं जातं असं 71 टक्के जणांनी मान्य केलं. तर फिजिकल वर्कस्पेसमधील नेटवर्किंगमुळे ते समाधानी नाही, असं 72 टक्के जणांनी स्वीकारलं. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 74 टक्के जणांनी संयुक्तरित्या मान्य केलं की ते करिअर ग्रोथने समाधानी नाही. यापैकी काहींना वाटतं की सातत्याने दूर काम करत राहिल्यामुळे प्रोफेशनल ग्रोथमध्ये घसरण झाली.
Work From Home नंतर ऑफिसमध्ये परतण्याऐवजी कर्मचारी नोकरी सोडत आहेत : सर्व्हे
कमी पगारात काम करु शकतो, पण....
Awfis च्या या सर्वेक्षणात म्हटलं आहे की, आम्हाला हे हायब्रिड वर्क मॉडेल आवडत आहे, ज्यात आम्ही घरातून आणि ऑफिसमधूनही काम करु शकतो, असं 72 टक्के जणांनी स्वीकारलं. तर 57 टक्के जणांचं म्हणणं आहे की, लवचिक पर्याय जिथे उपलब्ध आहेत, त्यासाठी कमी पगारातही नोकरी बदलण्यासाठी तयार आहे.
आम्हाला ऑफिसच्या जवळच्या शाखेत काम करायला आवडेल किंवा कंपनीकडून को-वर्किंग स्पेस दिला तर तिथे काम करायला आवडेल, अशी इच्छा
58 टक्के प्रोफेशनल्सनी व्यक्त केली.
सर्वेक्षणातील सुमारे 82 टक्के लोकांनी म्हटलं की, लस घेतल्यानंतर ऑफिसमध्ये परतण्यास कोणतीही अडचण नाही पण थोडी लवचिकता मिळायला हवी. अकारा शहरांमध्ये Awfis चे 75 केंद्र असून एकूण 40 हजार जागा आहेत.