Benjamin Netanyahu : इस्रायल पीएम नेतान्याहूंच्या घरावर महिन्याभरात दुसऱ्यांदा बाॅम्ब हल्ला; दारात आगीचे गोळे पडले
Benjamin Netanyahu : यापूर्वी 19 ऑक्टोबरला नेतन्याहू यांच्या घरावर हिजबुल्लाहने हल्ला केला होता. त्यानंतर नेतान्याहू यांच्या घराजवळील इमारतीवर ड्रोन पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Benjamin Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सीझेरिया येथील घरावर पुन्हा हल्ला झाला आहे. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांच्या घराच्या दिशेने दोन फ्लेअर (फायर गोळे) उडवण्यात आले, जे घराच्या अंगणात पडले. इस्रायली पोलिसांनी याला दुजोरा दिला आहे. हा हल्ला कुठून झाला आणि कोणी केला याची माहिती सध्या उपलब्ध नाही.
19 ऑक्टोबरला नेतन्याहू यांच्या घरावर हिजबुल्लाहचा हल्ला
इस्त्रायली सुरक्षा एजन्सी शिन बेटने एका निवेदनात म्हटले आहे की, या घटनेत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. हल्ल्याच्या वेळी नेतान्याहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नव्हते, असेही सुरक्षा एजन्सीने म्हटले आहे. त्यांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. यापूर्वी 19 ऑक्टोबरला नेतन्याहू यांच्या घरावर हिजबुल्लाहने हल्ला केला होता. त्यानंतर नेतान्याहू यांच्या घराजवळील इमारतीवर ड्रोन पडले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यावेळीही नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा घरी नव्हते.
#Breaking Reports: 2 bombs fired at Israel Prime Minister Benjamin Netanyahu's Caesarea house, no damage or injury reported. @netanyahu @IsraeliPM pic.twitter.com/jKogD7Edkb
— Mahalingam Ponnusamy (@mahajournalist) November 17, 2024
सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला
इस्रायलच्या पंतप्रधानांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला आहे. विरोधी पक्षनेते यायर लॅपिड आणि बेनी गँट्झ यांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. इस्त्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी सोशल मीडियावर सांगितले की, मर्यादा ओलांडल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करावी.
आयर्न डोम असूनही इस्त्रायल हल्ले का थांबवू शकत नाही?
जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राला पाडण्यात इस्रायलला फारशी अडचण येत नाही, असे सुरक्षा तज्ज्ञांचे मत आहे. मात्र कमी पल्ल्याच्या रॉकेट किंवा ड्रोन पकडण्यात सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरत आहेत. नेतान्याहू यांच्या घरावर गेल्या वेळी ड्रोनने हल्ला केला होता, तेव्हा फक्त एक ड्रोन पाडण्यासाठी इस्रायलला चार लढाऊ विमाने आणि एक क्षेपणास्त्र सोडावे लागले होते.
संरक्षण तज्ञ लिरन एन्टेबे यांनी सांगितले की, ड्रोन खूप कमी उंचीवर उडते. त्यावेळी त्याला लक्ष्य करणे धोकादायक ठरू शकते, कारण ते स्फोटकांनी भरलेले असते. यामुळे घरांचे आणि लोकांचे नुकसान होऊ शकते. इस्त्रायलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रोन किंवा क्षेपणास्त्राने मोठ्या प्रमाणावर हल्ला होत असला तरी त्याला सामोरे जाण्यासाठी इस्रायलकडे पुरेशी व्यवस्था नाही. ते म्हणाले की, काही क्षेपणास्त्रे थांबवता येतात, पण अनेक आकस्मिक हल्ले थांबवणे आयर्न डोमलाही शक्य नाही.
इतर महत्वाच्या बातम्या