एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजितदादा पुन्हा भावनिक, म्हणाले, 'बारामतीला माझ्या कामाची किंमत नाही, कॅनलचं पाणी बंद झाल्यावर माझी आठवण येईल'

Baramati Vidhan Sabha constituency: बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदारांना अजित पवारांकडून सातत्याने भावनिक आवाहन केले जात आहे. मी नसेन तेव्हा तुम्हाला किंमत कळेल.

बारामती: राज्यातील विधानसभा निवडणुकीतील सर्वात हायव्होल्टेज लढत अशी वर्णन केल्या जाणाऱ्या बारामतीमध्ये आता प्रचाराची रंगत शिगेला पोहोचली आहे. सोमवारी बारामतीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार या दोघांच्या सांगता सभा होणार आहेत. त्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी पुन्हा एकदा भावनिक विधान करत बारामतीकरांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे. मला वाटायला लागलं आहे की, आपण फार काम करतो त्याची किंमत बारामतीकरांना राहिली नाही, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

परवा साहेब म्हणाले की, मी तीस वर्षे काम केलं, आता पुढच्याला संधी द्या. मला तर काय कळतच नाही,पवारांशिवाय दुसरा कोणी हाय का नाय ? बाकीच्यांनी काय करावं? गोट्या खेळाव्यात का ? सगळं एकाच घरात. ज्याला संधी मिळते त्याच्यात कर्तृत्व गाजवण्याची धमक असावी लागते, याचा माळेगावकरांनी विचार करावा, असे अजित पवार यांनी म्हटले. आदरणीय साहेबांनी सांगितलं की, दीड वर्षानंतर मी आता राज्यसभा वगैरे जाणार नाही यापासून बाजूला राहणार. पण यानंतर बारामती तालुक्याला कोण पुढे नेईल ? एवढं जर समजलं तर माळेगावकरांना विनंती आहे. साहेबांना पाहुन सुप्रियाला मतदान केलं, आता मला विधानसभेला मतदान करा, असे भावनिक आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केले.

शंभर शंभर कोटीचे प्रोजेक्ट राबवायचे साखर कारखान्याचे चांगले भाव द्यायचे, विकास करायचा. तरीदेखील माळेगावमध्ये काटे आणि तावरे काय चाललयं हे मला कळत नाही. तुम्हाला जर मदत करायची असेल तर करा माझा काय आग्रह नाही पण यापुढे काही गोष्ट ठरवल्या आहेत. माळेगाव भागात ऊसाशिवाय काही पिकत नव्हतं, पण आज चित्र बदलले. मला तर काय काय लोकांचं कळत नाही. मागे काही सहकारी म्हणाले दादांचा आदर राखू, मान राखू, आम्ही ताईंना लोकसभेला जायचं त्या ठिकाणी ठरवलं, विधानसभेला आम्ही तुमचा विचार करू. पण माझ्याकडे एक बोलायचं पाठवलं की दुसरंच करायचं.  1990 पासून मी निवडणुकीला सामोरा जातोय. तुम्ही ती जबाबदारी माझ्यावर दिली. मी कधीही सभेला पैसे देऊन माणसं आणली नाहीत. चुकीच्या सवयी लावून फार सोपं असतं. पण चांगल्या सवयी लावून विचार आणि पुढे जाणं यात खरं लोकांचे भले आहे, असे अजित पवार यांनी म्हटले.

कॅनलचं पाणी बंद झाल्यावर तुम्हाला माझी आठवण येईल: अजित पवार

लाडक्या बहीण योजनेचा गरीब महिलांना फायदा झाला, शून्य वीज बिल आपण देत आहोत, याचा विचार करा. दुधाचं अनुदान वाढवलं. मी उद्या सभा घेणार आहे त्यात विस्तृतपणे बोलणार आहे. त्यांनी पण सभा लावली आहे ते त्यांचे मत मांडतील मी माझे मत मांडेल. बारामतीची विकासाची वाटचाल चालू ठेवायचे असेल तर मला मतदान करा. लाडकी बहीण योजना, वीज बिल माफीची योजना, या  योजना चालू ठेवायचे असतील तर घड्याळाला मतदान करा. मी यावेळी लक्ष घातलं नसतं ना तर नदीला पण आणि कॅनलला पण अडचण आली असती. मी न विचारताच करतोय पाणी येतय सगळं होतंय एकदा जर पाणी बंद झालं ना मग अजित पवारची आठवण येईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमची प्रशासनावर पकड आहे,म्हणून कामे होतात. आजुबाजूच्या तालुक्यात जाऊन जरा बघा मग कळेल तुमचा लोकप्रतिनिधी काय करू शकतो 9000 कोटी रुपये कसं आणू शकतो,पण याची किंमत राहिना, याकडे अजित पवारांनी बारामतीकरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मी तिथे रस्ते मंजूर करतो त्याची तुम्हाला किंमत राहत नाही, सहजासहजी मंजूर होतेय. 30 ते 35 टक्के मतं माळेगावमध्ये सुनेत्राला मिळाली. मला सांगितलं असतं तर उभंच केलं नसतं, झाकली मूठ सव्वा लाखाची राहिली असती. संस्था चांगल्या चालवायच्या असतील तर तिथे आधारित दबदबा लागतो. एकेकाळी बारामतीपेक्षा फलटण पुढे होते, आज आपण त्यांच्यापुढे आहोत. एकाने सांगावा की, अजित पवार आम्ही संस्था चांगली चालवत असताना तुम्ही मदत केली नाही, असा सवालही अजित पवार यांनी माळेगावमधील जनतेला विचारला. 

आणखी वाचा

शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
Embed widget