एक्स्प्लोर

AAP : अजय माकन यांची 24 तासांत हकालपट्टी करा, अन्यथा तुम्हाला इंडिया आघाडीतून बाहेर काढू; 'आप'चा काँग्रेसला अल्टिमेटम

AAP Delhi Congress conflict : काँग्रेसचे अजय माकन हे भाजपच्या कार्यालयातून आलेली स्क्रिप्ट वाचतात. काँग्रेसच्या नेत्यांना भाजपकडून पैसा पुरवला जात असल्याचा आरोप आप पक्षाने केला आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून काही काँग्रेस उमेदवारांना अर्थसहाय्य करत असल्याचा गंभीर आरोप दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी केला. भाजपने काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित, फरहाद सूरी यांना कोट्यवधींचा निधी दिल्याचा दावाही आतिशींनी केलाय. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात काँग्रेसने अजय माकन यांच्यावर 24 तासांत कारवाई करावी असा इशारा दिला आहे. अजय माकन यांच्यावर कारवाई करा अन्यथा इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा केली जाईल आणि काँग्रेसची हकालपट्टी करण्याची मागणी केली जाईल, असा थेट इशारा आम आदमी पक्षानं दिला आहे. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या आधीच आम आदमी पार्टीने (AAP) आणि काँग्रेसमध्ये तणाव निर्माण झाल्याचं दिसून येतंय. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अजय माकन यांच्यावर कारवाईची मागणी केली. काँग्रेसने तसे न केल्यास त्यांना इंडिया ब्लॉकमधून काढून टाकण्यासाठी आघाडीतील इतर पक्षांशी चर्चा केली जाईल असे सांगितले.

काय म्हणाले होते अजय माकन? 

अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणे आणि युती करणे ही चूक होती. त्यांची कोणतीही विचारधारा नाही, केजरीवाल देशद्रोही आहेत असं वक्तव्य काँग्रेस नेते अजय माकन यांनी केलं होतं. त्यावर आता आपकडून जोरदार टीका केली जात आहे. 

माकन हे भाजपच्या सांगण्यावरून काम करतात

खासदार संजय सिंह म्हणाले की, अजय माकन हे भाजपकडून आलेली स्क्रिप्ट वाचतात, त्यांच्या सांगण्यावरून वक्तव्य करतात. माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटले आहे. दिल्लीतील जनतेसाठी हॉस्पिटल, शिक्षण, पाण्याची सोय करणारे केजरीवाल देशद्रोही कसे? अजय माकन यांनी कोणत्याही भाजपच्या नेत्याला या आधी देशद्रोही म्हटलं नव्हतं. काँग्रेस पक्षाने 24 तासांत त्यांच्यावर कारवाई करावी. जर काँग्रेसने तसे केले नाही, तर आप इंडिया आघाडीच्या नेत्यांकडे काँग्रेसला या आघाडीतून काढून टाकण्याची मागणी करेल. 

काँग्रेसच्या उमेदवारांची यादी ही भाजपच्या कार्यालयातून आल्यासारखी वाटते. आप पक्षाला नुकसान पोहोचवण्यासाठीच हे सगळं केलं जातंय. काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना केजरीवाल यांच्या विरोधात कोण उभं करतंय? असा सवाल खासदार संजय सिंह यांनी केला. 

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिल्ली विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी अरविंद केजरीवालांच्या आप पक्षाने कंबर कसली आहे. तर दिल्ली कोणत्याही परिस्थितीत आपल्या हाती घ्यायचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. 

अरविंद केजरीवाल यांचा पक्ष लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा भाग होता. आपने आणि काँग्रेसने चंदीगड, दिल्ली, हरियाणा, गोवा आणि गुजरातमध्ये एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. पण पंजाबमध्ये पक्षाने काँग्रेसविरुद्ध निवडणूक लढवली. त्या आधी दिल्ली विधानसभा निवडणुकीतही आप पक्षाने स्वतंत्र्य निवडणूक लढवून सत्ता काबीज केली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Thane : 55 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश, शिंदेंचं भाषण, ठाकरेंवर हल्लाबोलRaigad Marathi Family Issue : रायगडमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूकDhananjay Deshmukh : वाल्मिक कराडला कोणता आजार झाला होता याची माहिती द्या : धनंजय देशमुखBaba Siddiqui Case Update :बाबा सिद्दिकींच्या डायरीतलं अखेरचं नाव मोहित कंबोज यांचं, झिशान सिद्दिकींचा जबाब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला, पालकमंत्री अजित पवार 30 जानेवारीला बीडला जाणार, कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक
Baba Siddique& Mohit Kamboj: बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं, WhatsApp चॅट केलं अन् पुढच्या काही क्षणांत आक्रित घडलं
बाबा सिद्दीकींनी डायरीत मोहित कंबोज यांचं नाव लिहलं अन् पुढच्या काही क्षणांत धडाधड फायरिंग
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
धक्कादायक! रात्री गेम खेळत होती, दुसऱ्या दिवशी खोलीत रक्ताच्या थारोळ्यात, नागपूरमध्ये 17 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल
Mohit Kamboj: हत्येच्या दिवशी बाबा सिद्दीकींशी WhatsApp चॅटिंग केल्याची माहिती उघड होताच मोहित कंबोजांचं स्पष्टीकरण, म्हणाले....
बाबा सिद्दीकींच्या डायरीत शेवटचं नाव अन् WhatsApp चॅटिंग; आरोप होताच मोहित कंबोजांचं तातडीने स्पष्टीकरण, म्हणाले...
Guillain Barre Syndrome: गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, पुण्यानंतर आता कोल्हापूरात फैलाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह
मोठी बातमी: कोल्हापुरात गुलेन बॅरी सिंड्रोमचा शिरकाव, दोन रुग्ण पॉझिटिव्ह, चिंता वाढली
Solapur Crime:  संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
संतापजनक! अल्पवयीन मुलीला शिक्षकानं प्रपोज केलं, विद्यार्थिनीने नकार देताच केलं दुष्कृत्य, सोलापूरातील शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील सर्वात मोठी अपडेट! डायरीत भाजपच्या मोहित कंबोज यांचं नाव
Maharashtra Weather: उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
उत्तरेसह दक्षिणेकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस झोडपणार, महाराष्ट्रात काय स्थिती? IMDने सांगितलं..
Embed widget