एक्स्प्लोर
‘वो क़त्ल भी करते है तो चर्चा नही होती’, ‘आप’ची RSSवर टीका
"हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते है तो चर्चा नही होती" अशा शब्दात 'आप'चे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे.
मुंबई : "हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम, वो क़त्ल भी करते है तो चर्चा नही होती" अशा शब्दात 'आप'चे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे.
‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील.’असं वक्तव्य मोहन भागवत यांनी काल (रविवार) मुज्जफरपूर येथे केलं. त्यानंतर आम आदमी पक्षाने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय सिंह यांनी ट्विटरवरुन मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. 'जर हे वक्तव्य दुसऱ्या कोणत्या पक्षाच्या नेत्याने दिलं असतं तर भाजपच्या लोकांनी त्याला आतापर्यंत पाकिस्तानात धाडलं असतं. मीडियाने तर फाशीच्या शिक्षेची मागणी केली असती. पण आता गोष्ट भागवतांची आहे.' असं ते म्हणाले. मोहन भागवत यांचं नेमकं वक्तव्य काय? ‘सैनिकांना देशसेवेसाठी तयार होण्यासाठी 6 ते 7 महिने लागतात. मात्र देशाला गरज पडली तर तीन दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सज्ज होतील. ‘संघ ही लष्करी संघटना नाही. पण देशाला गरज असेल तेव्हा सैनिकांच्या आधी आम्ही तयार होऊ.’ आरएसएसचं स्पष्टीकरण : 'नागरिकांमधून सैनिक तयार करायचे असल्यास त्यांना प्रशिक्षित व्हायला सहा महिन्यांचा वेळ लागतो. पण लष्कराने स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिलं तर ते तीन दिवसात तयार होतील. असं मोहन भागवत यांनी वक्तव्य केलं होतं.' असं स्पष्टीकरण आरएसएसकडून देण्यात आलं आहे. संबंधित बातम्या : गरज पडली तर सैनिकांच्या आधी स्वयंसेवक सज्ज होतील : भागवतअगर ये बयान किसी दूसरी पार्टी के नेता ने दिया होता तो,भाजपाई अब तक उसे पाकिस्तान भेज देते,मीडिया तो फाँसी की सज़ा की माँग कर देता, लेकिन बात भागवत की है "हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम,वो क़त्ल भी करते है तो चर्चा नही होता" https://t.co/to9icunyjX
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) February 11, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement