एक्स्प्लोर

Aam Adami Party : भाजपकडून आपच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर, दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न, संजय सिंह यांचा खळबळजनक आरोप 

भाजपकडून आम आदमी पार्टीच्या (Aam Adami Party) नेत्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आपचे नेते संजय सिंह (sanjay singh) यांनी केला आहे.

Aam Adami Party : भाजपकडून आम आदमी पार्टीच्या (Aam Adami Party) नेत्यांना विकत घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आपचे नेते संजय सिंह (sanjay singh) यांनी केला आहे. संजय सिंह यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. तसेच भाजपवर आरोप देखील त्यांनी केले आहेत. भाजपच्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर दिली असल्याचे ते म्हणाले. भाजपकडून दिल्लीतील आपचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याबाबत जे घडले ते इतर आमदारांसोबत केले जात आहे. मोदी सरकार लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम करत असल्याचे देखील संजय सिंह म्हणाले.

दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर त्यांनी केलेले प्रयत्न इतर आमदारांसोबत केले जात आहेत. तपास यंत्रणेला धमकावून भाजप दिल्लीतील आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा संजय सिंह यांनी केला आहे. यावेळी भाजपने ज्या आमदारांना ऑफर दिली आहे, त्या आमदारांची संजय सिंह यांनी नावे देखील सांगितली. यामध्ये आमदार अजय दत्त, सोमनाथ भारती, कुलदीप, संजीव झा यांना भाजपने ऑफर दिली आहे. भाजपचे लोक त्यांच्याकडे येतात आणि म्हणतात 20 कोटींची ऑफर घ्या नाहीतर तुमच्यावरही सिसोदिया यांच्यासारखे गुन्हे दाखल करु असा इशारा देत असल्याचे ते म्हणाले. भाजपकडून आम आदमी पार्टीच्या आमदारांना धमकावण्याचे प्रयत्न सुरु असल्याचेही सिंह यावेळी म्हणाले.

आम्ही केजरीवाल यांचे सैनिक आहोत, विकले जाणार नाही.

दरम्यान, संजय सिंह यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ही दिल्ली आहे, आम्ही केजरीवाल यांचे सैनिक आहोत. आम्ही विकले जाणार नाही. आमच्या आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न केला पण आमच्या आमदाराने त्यांचे कारस्थान उघड केल्याचे संजय सिंह यावेळी म्हणाले. त्याचवेळी आपचे नेते सोमनाथ भारती यांनीही भाजपचे लोक माझ्याकडे आल्याचे सांगितले. आमच्याकडे या नाहीतर मनिष सिसोदिया यांच्यासारखी तुमची देखील अवस्था करु असा इशारा भाजपच्या नेत्यांनी दिल्याचे  सोमनाथ भारती यांनी सांगितले.

मनिष सिसोदिया यांच्यावर गुन्हा दाखल

दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने मनिष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने ईडीकडे (ED) महत्त्वाची कागदपत्रे सोपवली होती. त्यानंतर ईडीने मनिष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने मद्य घोटाळ्याशी संबंधित एफआयआर आणि अन्य दस्ताऐवजांची माहिती ईडीला सोपवली होती. त्यामुळे सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह 14 जणांविरोधात लुक आउट सर्कुलर जारी केले होते. यामध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केलेल्या आरोपींच्या नावाचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget