भाजपात या, तुम्हाला मुख्यमंत्री करू, सीबीआय चौकशी बंद करू; मनिष सिसोदियांना दिलेल्या ऑफरचे कॉल रेकॉर्डिंग असल्याचा 'आप'चा दावा
Delhi CM Aervind Kejriwal : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याकडे त्यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफरबाबतचे कॉल रेकॉर्डिंग असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे.
Delhi CM Aervind Kejriwal : दिल्लीत भाजपचे (BJP) ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याचा दावा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केलाय. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या भाजपकडून आपल्याला ऑफर देण्यात आली होती, या दाव्यानंतर केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्याकडे त्यांना देण्यात आलेल्या ऑफरबाबतचे भाजपचे कॉल रेकॉर्डिंग असल्याची माहिती आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. आवश्यकता भासल्यास हे कॉल रेकॉर्डिंग बाहेर काढू असे 'आप'ने म्हटले आहे.
आपल्याला भाजपमध्ये येण्याची ऑफर देण्यात आली आहे. मी भाजपमध्ये गेलो तर सीबीआय आणि ईडीकडून सुरू असलेली चौकशी बंद करू अशी भाजपने मला ऑफर दिली आहे. परंतु, मी महाराणा प्रताप यांचा वंशज आहे, मी राजपूत आहे. मी माझे डोके कापून टाकीन, परंतु भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत. तुम्हाला जे करायचे ते करा, असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. सिसोदिया यांच्या या ट्विटला केजरीवाल यांनी उत्तर देत दिल्लीतील भाजपचे ऑपरेशन लोटस अयशस्वी झाल्याचे म्हटले आहे.
दिल्ली में ऑपरेशन लोटस फेल https://t.co/y8XBCSPS0d
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 22, 2022
सिसोदिया यांच्या ट्विटला उत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, "याचा अर्थ सीबीआय ईडी रेडचा नवीन लिकर धोरण आणि भ्रष्टाचाराशी काही संबंध नाही? दिल्लीतील ‘आप’ सरकार पाडण्यासाठीच हे छापे पडले? जसे त्यांनी इतर राज्यात केले आहे. दिल्लीत ऑपरेशन लोटस अयशस्वी झाले आहे."
इसका मतलब CBI ED रेड का शराब नीति और भ्रष्टाचार से कोई लेना देना नहीं? ये रेड केवल दिल्ली में “आप” की सरकार गिराने के लिए की गयीं? जैसे इन्होंने दूसरे राज्यों में किया है। https://t.co/i2RWDaHJNT
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 22, 2022
दरम्यान, सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मनीष सिसोदिया यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या
Delhi Liquor Policy : मनीष सिसोदियांना लुकआऊट नोटीस पाठवलीच नाही, सीबीआयचं स्पष्टीकरण
Delhi Liquor Policy: मी तपासाच्या विरोधात नाही, मात्र तपास यंत्रणांनी गुजरातमध्येही तपास करावा; सीबीआयच्या कारवाईवर मनीष सिसोदिया यांची प्रतिक्रिया