(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid vaccination : आधार कार्ड शिवाय 87 लाख नागरिकांचे लसीकरण, केंद्र सरकारचे SCला स्पष्टीकरण
कोरोना लसीकरण नोंदणी आधार कार्ड व्यतिरिक्त इतर नऊ प्रकारच्या ओळखपत्रांसह केली जाऊ शकते.
Covid vaccination : कोरोना लसीकरणासाठी (covid vaccination) आधार कार्ड (adhaar card) आवश्यक नाही. याबाबत केंद्र सरकारने (central government)सर्वोच्च न्यायालयाला माहिती देताना सांगितले की, कोविड लसीकरण करण्यासाठी केवळ आधार कार्ड (aadhar card) वैध नाही. सरकारने आधारकार्ड नसलेल्या सुमारे 87 लाख नागरिकांचे लसीकरण केले आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले. कोविन पोर्टलवर कोविड लसीकरणाची नोंदणी आधार कार्ड व्यतिरिक्त, इतर नऊ प्रकारच्या ओळखपत्रांसह केली जाऊ शकते.
आधार कार्ड शिवाय 87 लाख नागरिकांचे केले लसीकरण
केंद्र सरकारने आज (ता.७) सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, कोविड लसीकरणासाठी आधारला ओळखपत्र म्हणून मान्यता देण्यास आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात निकाली काढण्यात आली. कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूर्ण आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाला सांगितले की, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार कार्ड, रेशन कार्ड यांसह नऊ ओळख कागदपत्रांपैकी एकाचा वापर लसीकरण नोंदणीसाठी केला जाऊ शकतो. खरं तर, या प्रकरणी नोटीस जारी करण्यात आली होती, ज्यानुसार कोविन अॅपवर फक्त आधार कार्डचा प्रचार केला जात आहे. केवळ आधार नसल्यामुळे लसीकरण नाकारण्यात आल्याची तक्रार याचिकाकर्त्याने केली होती.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की 15 जानेवारी 2022 पर्यंत देशात 156 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत, परंतु संपूर्ण देशातील जनता अजूनही लसीकरणापासून दूर आहे.
65 कोटी लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले
16 जानेवारी 2021 रोजी देशात आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर असलेल्या कामगारांचे लसीकरण सुरू झाले. मागील एक वर्षापासून लसीकरण थांबले आहे. 18+ वयोगटातील 95 कोटी लोकसंख्येला लसीचा डोस दिला जाणार होता.
आतापर्यंत 87 कोटींना पहिला डोस मिळाला आहे. म्हणजेच, सुमारे 92 टक्के लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे. त्याच वेळी, सुमारे 65 कोटी लोकसंख्येला दोन्ही डोस मिळाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :