एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अवघ्या एका रुपयात साडी, पण अट एकच
बंगळुरु : नोटाबंदीला पाठिंबा देण्यासाठी कर्नाटकातील बिदरच्या एका साडीविक्रेत्याने भन्नाट आयडिया वापरली आहे. हा विक्रेता 100 रुपयांची साडी अवघ्या एक रुपयाला विकत आहे. मात्र त्यासाठी अट एवढीच आहे की साडीची खरेदी एक रुपयाच्या नाण्याने नाही तर नोटद्वारे केली जावी.
या स्कीममुळे सृष्टी-दृष्टी साडी सेंटरमध्ये खरेदीसाठी महिलांची झुंबड उडाली आहे. काही महिलांनी तर साडी खरेदी करण्यासाठी कामावरुन सुट्टी घेतली आहे. गर्दीमुळे गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांना दुकानाबाहेर बंदोबस्त लावावा लागला.
या दुकानाचा मालक चंद्रशेखर पसार्गे यांनी काही दिवसात या व्यक्तीने हजारो साड्या विकल्या असून नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे योग्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही ऑफर नोटाबंदीसह ख्रिसमस आणि न्यू इयर साजरा करण्यासाठी आहे, असा बोर्डही त्यांनी दुकानाबाहेर लावला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
भारत
Advertisement