एक्स्प्लोर

काँग्रेसच्या महाअधिवेशनातली 10 रंजक क्षणचित्रे

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचं पहिलं महाअधिवेशन दिल्लीत पार पडतं आहे. तीन दिवसीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. 2019 च्या दृष्टीनं राहुल गांधी पक्षाला नेमकी काय दिशा देणार, मरगळलेल्या पक्षात नवी उर्जा भरु शकणार का? या दृष्टीनं हे अधिवेशन महत्वाचं आहे.

नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर पक्षाचं पहिलं महाअधिवेशन दिल्लीत पार पडतं आहे. तीन दिवसीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. 2019 च्या दृष्टीनं राहुल गांधी पक्षाला नेमकी काय दिशा देणार, मरगळलेल्या पक्षात नवी उर्जा भरु शकणार का? या दृष्टीनं हे अधिवेशन महत्वाचं आहे. ईव्हीएमला विरोध करणारा राजकीय ठराव, राहुल गांधींचं शुभारंभाचं भाषण, सोनियांच्या कानपिचक्या. अशा सगळ्यांनी आजचा दिवस गाजला. पाहुयात काँग्रेसच्या महाअधिवेशनातली 10 खास क्षणचित्रे- 1. वैयक्तिक अहंकार, महत्वकांक्षांना कुरवाळत बसण्याची ही वेळ नाही. आपण पक्षासाठी काय करु शकतो हे बघितलं पाहिजे. पक्षाचा विजय हा देशाचा विजय ठरेल. अशा शब्दांत सोनिया गांधींनी काँग्रेसवासियांना संदेश दिला. एकमेकांचे पाय ओढण्याची संस्कृती काँग्रेसमध्ये पूर्वीपासून चालत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सोनियांची ही कानउघाडणी होती. 2. राहुल गांधींच्या भाषणानं हे या महाअधिवेशनाची औपचारिक सुरुवात झाली. राहुल यांचं समारोपाचं भाषण हे प्रमुख असणार आहे. आजचं भाषण किमान दहा मिनिटांचं असेल असं अपेक्षित होतं. पण राहुल गांधींनी अवघ्या साडेचार मिनिटांतच ते आटोपलं. मोदी द्वेषाचं राजकारण करतात, आम्ही प्रेमाचं राजकारण करतो. या जुन्याच लाईनवर त्यांनी आपलं छोटेखानी भाषण संपवलं. 3. या अधिवेशनात जो राजकीय ठराव मंजूर झाला, त्यानुसार देशात ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे निवडणूक व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. जगातल्या काही प्रगत राष्ट्रांनीही ईव्हीएममुळे गैरप्रकाराला वाव मिळत असल्याचं लक्षात येताच पुन्हा मतपत्रिकांचा मार्ग अवलंबल्याचं या प्रस्तावात म्हटलं आहे. 4. पंतप्रधान मोदी जरी देशात एकत्रित निवडणुकांसाठी आग्रही असले तरी काँग्रेसनं आज आपल्या राजकीय ठरावात याला स्पष्ट विरोध केला आहे. एकत्रित निवडणुका या घटनेतल्या तत्वांना धरुन नाहीत असं म्हणत काँग्रेसनं विरोध केला आहे. पण असा विरोध करताना देशात 1967 पर्यंत एकत्रितच निवडणुका होत होत्या ही बाब बहुधा काँग्रेस विसरली असावी. 5. राजकीय प्रस्ताव मांडण्यासाठी लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे व्यासपीठावर होते. खर्गेंनी आपल्या भाषणात शेरो-शायरीची धमाल उडवून दिली. देशातल्या शेतकऱ्यांची अवस्था मोदींच्या सरकारमध्ये कशी आहे हे सांगताना खर्गेंनी... ‘कत्ल हुआ हमारा, इस तरह किश्तोंमें. कभी खंजर बदल गया, कभी कातिल बदल गये असा’ शेर ऐकवला. 6. काँग्रेस महाअधिवेशनात जो राजकीय प्रस्ताव मल्लिकार्जुन खर्गेंनी मांडला, त्यावर बोलण्याची पहिली संधी महाराष्ट्रातले युवा नेते आणि टीम राहुलचे सदस्य खा.राजीव सातव यांना मिळाली. 7. ‘पाँवर आँफ ट्रुथ’ अर्थात सत्याची ताकद या नावानं एक परिसंवाद या अधिवेशनात आयोजित करण्यात आलेला होता. नुकतेच राज्यसभेवर काँग्रेसकडून निर्वाचित राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी या परिसंवादाचं संचलन केलं. या परिसंवादात कपिल सिब्बल, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, खासदार सुष्मिता सिंग देव, काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या प्रमुख दिव्या स्पंदना, ज्येष्ठ पत्रकार मृणाल पांडे सहभागी झाल्या होत्या. 8. ‘महात्मा गांधी हे जगातले सर्वात उत्तम कम्युनिटेकर होते. त्या काळी संवादाची साधनं नसतानाही ते लोकांशी संवाद ठेवण्यासाठी धडपडायचे. आज जर ते असते तर सोशल मीडियाचा वापर त्यांनी अवश्य केला असता. खोटं पसरवणारे ही कला चांगली शिकलेत, मग ज्यांची बाजू खऱ्याची आहे ते मात्र यात मागे राहिलेत.’ असं सांगत कुमार केतकर यांनी पहिल्याच संधीत काँग्रेस कम्युनिकेशनवर अधिक भर देण्याचा सल्ला दिला. 9. एरव्ही काँग्रेसचं अधिवेशन म्हटलं की व्यासपीठावर नेत्यांची भाऊगर्दी दिसायची. त्यात कोण राहिला तर पुन्हा रुसव्याफुगव्यांची चर्चा. नेते व्यासपीठावर, कार्यकर्ते मात्र सतरंजीवर असं काहीसं चित्र असायचं. पण यावेळी व्यासपीठावर वक्ता वगळता कुणालाही स्थान नव्हतं. सर्वांच्या खुर्च्या खालीच ठेवण्यात आलेल्या होत्या. 10. राहुल गांधींच्या स्वागतासाठी सारखे पुढे-पुढे करायला येऊ नका, भाषण लांबलचक नको, अगदी 7-8 मिनिटांत संपवा. भाषण 7व्या              मिनिटाला नाही संपलं तर बझर वाजला जाईल अशा सूचना व्यासपीठावर दिल्या गेल्या. काँग्रेस बदलतीय म्हणायचं का? संबंधित बातम्या : ते द्वेषाचं राजकारण करतात, आम्ही प्रेमाचं : राहुल गांधी राहुल गांधींचं ट्विटर हँडल बदललं, फोटोसह स्टेटसही अपडेट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget