एक्स्प्लोर

देशभरात आजपासून नवे सात नियम लागू

आजपासून छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळेल. तर कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड द्यावा लागणार आहे. शिवाय गॅस दरात वाढ झाली आहे.

मुंबई: देशभरात 1 ऑक्टोबर 2018 अर्थात आजपासून नवे सात नियम लागू होणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. आजपासून छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळेल. तर कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड द्यावा लागणार आहे. शिवाय गॅस दरात वाढ झाली आहे. पीपीएफ, सुकन्या, समृद्धी, NSC आणि KVP वर जास्त व्याज आर्थिक  वर्षाची तिसरी तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळणार आहे. मुदत ठेव, रिकरिंग, ज्येष्ठ नागरिकांची बचत ठेव, मासिक उत्पन्न खातं, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पल्बिक प्रोव्हिडेंट फंड, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी स्कीमवर पहिल्यापेक्षा 0.40 टक्केपर्यंत जास्त व्याज मिळणार आहे. गॅस सिलेंडर महागलं - पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे एलपीजी आणि सीएनजीचे दरही वाढणार आहेत. अनुदानित एलपीजी सिलेंडर 2 रुपये 89 पैसे तर विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर तब्बल 59 रुपयांनी महागला आहे. कॉल ड्रॉप झाल्यास दंड -  कॉल ड्रॉपच्या समस्येला संपूर्ण देश वैतागला आहे. मात्र या समस्येवर आजपासून नवा उपाय लागू होणार आहे. कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. कॉल ड्रॉपच्या समस्येवर 2010 नंतर पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे. ई-कॉमर्स- ई कॉमर्स कंपन्यांना GST अंतर्गत टॅक्स कलेक्टर अॅट सोर्ससाठी सर्व राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथे त्यांचे पुरवठादार असतील. परदेशी कंपन्यांना रजिस्ट्रेशनसाठी एका एजेंटचीही नियुक्ती करावी लागेल.  त्यामुळे ई कॉमर्स कंपन्यांना आपल्या पुरवठादारांना पेमेंट करण्यासाठी 1 टक्के TCS द्यावा लागेल. TDS- जीएसटी कायद्याअंतर्गत TDS आणि TCS च्या नव्या तरतुदी आजपासून लागू होतील. केंद्राच्या GST (CGST) कायद्यानुसार अधिसूचित संस्थांना आता 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवा पुरवठा केल्यास 1 टक्के TDS द्यावा लागणार आहे. त्याशिवाय राज्यांनाही राज्य कायद्यांअतर्गत 1 टक्के TDS लावावा लागणार आहे. बीएसई व्यवहार शुल्कात सूट- मुंबई शेअर बाजार अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) 1 ऑक्टोबरपासून कमोडिटी डेरिवेटिव्समध्ये व्यवहार सुरु करत आहे. त्यामुळे पहिल्या वर्षात व्यवहार शुल्क अर्थात ट्रान्झॅक्शन फी न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. PNB कडून कर्ज घेणं महागणार -  पंजाब नॅशनल बँकेने छोट्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेणं महागणार आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून 7 नवे नियम लागू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षातील नक्की नातं काय?Nagpur Crime : पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या, पोलिसांनी फोडलं बिंगSpecial Report on Mohan Bhagwat : कुंभमेळ्यात भागवतांविरोधात आखाडा? संघात काडी टाकण्याचा प्रयत्न?Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7  मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
परभणीत मुलींच्या जन्माचं अनोखं स्वागत, सोने अन् चांदीचं नाणं भेट, 7 मातांना दोन किलो जिलेबीचंही वाटप
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
Embed widget