एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाच महिन्यांत देशातील 60 वाघ दगावले!
नवी दिल्ली : गेल्या 5 महिन्यांत देशात 60 वाघांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. वाघांच्या मृत्यूच्या अधिकृत आकडेवारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मृत पावलेल्या वाघांचे वयोमान 4 ते 8 वर्षांदरम्यान आहे.
जानेवारी 2017 ते मे 2017 या कालावधीत मध्य प्रदेश ,कर्नाटक, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि इतर अशा 10 राज्यांमध्ये ह्या वाघांचा मृत्यू नोंदवला गेला आहे. यात मध्यप्रदेश व कर्नाटक या दोन राज्यात पाच महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी 13 वाघांचा मृत्यू झाला. तर या पाठोपाठ उत्तराखंडमध्ये 9 वाघ दगावले. या आकडेवारीनुसार, जिम कार्बेट या व्याघ्र प्रकल्पात सर्वाधिक मृत्यूंची नोंद घेण्यात आलेली आहे.
दुसरीकडे महाराष्ट्रात आठ वाघांचे मृत्यू झाल्याचे यावेळी नोंदवण्यात आलं आहे. यामध्ये 14 जानेवारी रोजी खापा व पूर्व पेंच प्रकल्पात, 14 फेब्रुवारी रोजी कोलितमारा, 14 एप्रिल पेंच, मानसिंगदेव, 27 एप्रिल ब्रम्हपुरी, 3 मे सावली, 18 मे तळोधी व 26 मे रोजी चिचपल्ली येथे उष्माघातामुळे वाघिणीचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ आसाममध्ये सात वाघांचा मृत्यू झालेला आहे. उत्तरप्रदेशात चार, तामिळनाडूमध्ये दोन तर छत्तीसगड, ओडिशा व केरळ या राज्यात प्रत्येकी एका वाघाच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली आहे.
दरम्यान, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय तसेच राज्याच्या वन विभागाकडून व्याघ्र संरक्षणाऐवजी व्याघ्र पर्यटनाला अवास्तव महत्त्व दिल्यामुळे, आणि व्याघ्र संरक्षणाकडे कमालीचे दुर्लक्ष केल्यामुळेच वाघांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याची टीका वन्यजीव प्रेमी करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement