एक्स्प्लोर
गोव्यात मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सहा मंत्र्यांचा पराभव

पणजी : उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भाजपला गोव्यात काँग्रेसने काटे की टक्कर दिली आहे. खुद्द मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या 6 मंत्र्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मांद्रेम मतदार संघातून पराभव झाला. काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी पार्सेकरांचा पराभव केला. सुभाष वेलिंगकरांच्या गोवा सुरक्षा मंचाने वेगळी चूल मांडल्यामुळे भाजपला मोठा फटका बसला. मतांच्या या ध्रुवीकरणाचा काँग्रेसला मोठा फायदा झालेला दिसत आहे. कारण मतमोजणीच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. भाजपने 13 आणि काँग्रेसने 17 जागांवर विजय मिळवला आहे. गोवा सुरक्षा मंच आणि महाराष्ट्र गोमंतक पक्षाने भाजपला मदत करण्याची तयारी दर्शवल्यामुळं भाजपचं पारडं काहीसं जड आहे. शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही गोव्यात भाजप सरकार स्थापन करेल, असा दावा केला आहे. भाजप पराभूत मंत्री :
- मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर
- उद्योगमंत्री महादेव नाईक
- पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर
- जलस्त्रोत मंत्री दयानंद मांद्रेकर
- वनमंत्री राजेंद्र आर्लेकर
- कामगारमंत्री आर्वेतान फुर्तादो
- भाजप - 13
- काँग्रेस - 17
- राष्ट्रवादी काँग्रेस -1
- महाराष्ट्रवादी गोमंतक - 3
- गोवा फॉरवर्ड पार्टी - 3
- अपक्ष/इतर - 3
- एकूण : 40
संबंधित बातम्या :
तीन वेळा आमदार राहिलेले गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर पराभूत
5 पैकी 2 मुख्यमंत्री हरले, गोवा आणि उत्तराखंडच्या CM चा पराभव
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























