एक्स्प्लोर

PM Narendra Modi : देशातील दूध उत्पादनात 44 टक्क्यांची वाढ, दुग्ध विकास क्षेत्राच खरं नेतृत्त्व महिलांकडेच : पंतप्रधान 

भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असा असून, गरीब देशांसाठी उद्योगांचे एक आदर्श उदाहरण ठरु शकेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केलं.

PM Narendra Modi : भारतातील दुग्ध सहकार हा जगातील एकमेव म्हणता येईल असा असून, गरीब देशांसाठी उद्योगांचे एक आदर्श उदाहरण ठरु शकेल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केलं. भारताच्या दुग्ध विकास (Dairy Development) क्षेत्राचे खरे नेतृत्व  महिलाच करत आहेत. कारण दुग्ध विकासात महिलांचे 70 टक्के प्रतिनिधीत्व असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 2014 मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. यात वाढ होऊन आता ते 210 दशलक्ष टन झाले आहे. म्हणजेच देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी दिल्लीजवळ ग्रेटर नोएडा इथे आंतरराष्ट्रीय डेयरी फेडरेशनच्या जागतिक दुग्ध व्यवसाय परिषदेचे उदघाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.

भारताच्या दुग्धव्यवसायाचं वैशिष्ट्य हे 'बहु-उत्पादना'पेक्षाही 'बहुसंख्यांनी' केलेली उत्पादने

दुग्ध व्यवसाय क्षेत्राची खरी क्षमता केवळ ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची नाही, तर जगभरातील लोकांच्या उपजीविकेचं साधन असल्याचे मोदी म्हणाले. दुग्ध व्यवसाय क्षेत्राशी संबंधित जगभरातील सर्व मान्यवर आणि महत्वाच्या व्यक्ती, या परिषदेसाठी एकत्र जमल्या आहेत. याचा मला अतिशय आनंद होत आहे. भारताच्या या क्षेत्रातील कल्पना आणि अनुभव जगासमोर मांडण्याची, त्यांच्या कल्पना स्वीकारण्यासाठी हे एक अत्यंत महत्वाचे माध्यम ठरणार असल्याचे मोदी म्हणाले. भारताच्या सांस्कृतिक पटलावर पशुधनाचे आणि दुधाशी संबंधित व्यवसायांचे महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केलं. यामुळेच भारताचे दुग्ध व्यवसाय क्षेत्र अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. जगातील इतर विकसित देशांच्या तुलनेत भारतात, हा व्यवसाय चालवणारा मोठा वर्ग, छोट्या शेतकऱ्यांचा आहे. जे जगात इतरत्र कुठे दिसत नाही. भारताच्या दुग्ध व्यवसाय क्षेत्राचे वैशिष्ट्य असे, की ते ‘बहु-उत्पादने’ पेक्षाही ‘बहुसंख्यांनी तयार केलेली उत्पादने” असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून दिवसातून दोन वेळा दूध संकलित 

भारतात दुग्ध व्यवसायात सहकार क्षेत्राचे जे भव्य जाळे पसरले आहे, ते तुम्हाला इतर कोणत्याही देशांत बघता येणार नाही.  हे दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थेचे लोक, दोन लाखांपेक्षा अधिक गावातील 2 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून दिवसातून दोन वेळा दूध संकलित करतात आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. या व्यवसायात कोणीही मध्यस्थ नसतो आणि त्यामुळं संपूर्ण प्रक्रियेतील 70 टक्क्यांपेक्षा अधिक निधी थेट शेतकऱ्यांकडे जातो असेही पंतप्रधान म्हणाले. देशात अनेक प्रकारच्या विपरीत परिस्थितीचा सामना करु शकणाऱ्या देशी जाती आहेत. यासाठी त्यांनी गुजरातच्या कच्छ भागातील बन्नी या म्हशींच्या अत्यंत धडधाकट जातीचे उदाहरण दिले. त्यांनी यावेळी बोलताना, म्हशींच्या मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादीचा उल्लेख केला. निळी रावी आणि पंढरपुरी या इतर जातींबद्दल तसेच गीर, सहिवाल, राठी, कांकरेज, थरपार्कर आणि हरियाणा या गाईंच्या जातींचा देखील त्यांनी उल्लेख केला.

दूध उत्पादनात 44 टक्क्यांची वाढ

भारताच्या दुग्ध विकास क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधित्व हे 70 टक्के आहे. याकडं त्यांनी लक्ष वेधलं. महिलाच भारतीय दुग्धविकास क्षेत्राचे खरे नेतृत्व करत आहेत. एवढेच नव्हे तर दूध उत्पादक सहकारी संस्थांमधील सदस्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा अधिक सदस्य महिलाच आहेत. साडेआठ लाख कोटी रुपयांहून अधिक उलाढाल असणारे हे क्षेत्र गहू आणि तांदूळ यांच्या एकत्रित मूल्यापेक्षा अधिक मूल्याचे आहे. भारतातील महिलाशक्तीने एवढे मोठे क्षेत्र संचालित केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. 2014 मध्ये भारतात 146 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. यात वाढ होऊन आता ते 210 दशलक्ष टन झाले आहे. म्हणजेच देशाच्या दूध उत्पादनात सुमारे 44 टक्क्यांची वाढ झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जागतिक स्तरावर दूध निर्मितीमध्ये दरवर्षी 2 टक्के दरानं वाढ होत आहे. त्या तुलनेत भारतात दूध उत्पादनात 6 टक्के विकास दराने वाढ होत आहे याचा देखील त्यांनी उल्लेख केला.

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget