29 October In History : दिवाळीत दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट, आज इतिहासात कोणत्या घटना घडल्या
On This Day In History : भारताच्या इतिहासात 29 ऑक्टोबर ही तारीख एका दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवली जाते. दिवाळीच्या उत्सव असतानाच 29 ऑक्टोबर 2005 मध्ये दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.
On This Day In History : भारताच्या इतिहासात 29 ऑक्टोबर ही तारीख एका दु:खद घटनेसाठी लक्षात ठेवली जाते. दिवाळीच्या उत्सव असतानाच 29 ऑक्टोबर 2005 मध्ये दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. दिल्लीमधील बॉम्बस्फोटमुळे देशातील दिवाळी उत्सव दु:खामध्ये बदलला होता. ऑक्टोबरमध्ये दिल्लीमध्ये मोठे मोठे उत्सव असतात. रामलीला, दसरा, दिवळी यासर गोवर्धन पूजा यासारख्या उत्सवात राजधानी दिल्ली व्यस्त असते. एकापाठोपाठ येणाऱ्या उत्सवामुळे दिल्लीमध्ये गर्दी असते. हीच संधी साधत 29 ऑक्टोबर रोजी धनतेरसच्या दिवळी दिल्लीमध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 60 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले होते. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत...
भारतासह जगभरात 29 ऑक्टोबरच्या दिवशी काय काय घडलं? पाहूयात
1911 : अमेरिकेतील प्रसिद्ध संपादक आणि प्रकाशक जोसफ पुलित्जर यांचं निधन
1923 : तुर्कस्तान देशाचा प्रजासत्ताक दिवस
1933 : फ्रान्सचे माजी पंतप्रधान पॉल पेनलिव्ह यांचे निधन
1958 : महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
1961 : संयुक्त अरब समुहातून सिराया हा देश वेगळा झाला
1964 : टांगानिका आणि झांजिबार एकत्र येऊन टांझानिया देश झाला.
1971 : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज मॅथ्यू हेडनचा जन्म
1975 : स्पेनमधून जनरल फ्रँको यांच्या सत्तेचा अंत झाला.
1981 : अभिनेते दादा साळवी यांचं निधन
1985 : बॉक्सर विजेंद्र सिंह यांचा जन्मदिवस
1989 : क्रिकेटपटू वरून आरोनचा जन्म
1997: अभिनेते दिलीपकुमार यांना एनटी रामाराव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
1999 : ओदिसामध्ये चक्रिवादळ आल्यामुळे मोठं नुकसान
2005: दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट
2015 : तब्बल 35 वर्षानंतर चीनमध्ये एक मूल एक हे धोरण बंद करण्यात आले.
2020 : गुजरातचे दहावे मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचं निधन