एक्स्प्लोर
Advertisement
आराध्याला नवं आयुष्य देणाऱ्या 14 महिन्यांच्या चिमुकल्याची कहाणी
सोमनाथच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमनाथ या जगातून जाताना दोन जणांना नवं आयुष्य देऊन गेला.
अहमदाबाद : सुरतमधील 14 महिन्यांचा सोमनाथ शाह या जगात राहिला नाही. मात्र त्याच्या हृदयाने नवी मुंबईतील 4 वर्षांच्या आराध्या मुळेला नवं आयुष्य दिलं. सोमनाथच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमनाथ या जगातून जाताना दोन जणांना नवं आयुष्य देऊन गेला.
गेल्या दीड वर्षांपासून हृदयाच्या शोधात असेलेल्या आराध्या मुळेवर अखेर यशस्वीरित्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंबईतील मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात काल सकाळी 9 वाजता या शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. दुपारी 3 वाजता हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्ण झाली.
आराध्याला एप्रिल 2016 ला अचानक त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आराध्याचं हृदय फक्त 10 टक्के काम करत होतं, असं आढळून आलं होतं. त्यामुळे तिच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय होता.
14 महिन्यांच्या सोमनाथच्या मृत्यूची हृदयद्रावक कहाणी
2 सप्टेंबर रोजी घरात खेळताना सोमनाथ शिडीहून कोसळला आणि डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याला 4 सप्टेंबर रोजी ब्रेनडेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर रुग्णालयाने ‘डोनेट लाईफ’ या एनजीओशी संपर्क साधला. एनजीओकडून सोमनाथच्या आई-वडिलांना अवयवदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आलं.
‘’सोमनाथच्या जन्मासाठी अनेक वर्ष नवस केले होते. अखेर गेल्या वर्षी आमचा नवस पूर्ण झाला आणि सोमनाथचा जन्म झाला. मात्र तो आम्हाला एवढ्या लवकर सोडून जाईल, असं कधीही वाटलं नव्हतं. आम्ही मुलगा तर गमावला. मात्र तो आराध्याच्या रुपाने अजूनही जिवंत आहे. सोमनाथच्या अंत्यसंस्कारानंतर आराध्याला भेटण्यासाठी मुंबईला जाऊ’’, असं सोमनाथच्या आई-वडिलांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितलं.
सोमनाथच्या हृदयाने तर आराध्याला नवं आयुष्य दिलंच. शिवाय एका दहा वर्षांच्या मुलालाही सोमनाथच्या किडनीने नवं आयुष्य मिळणार आहे. सोमनाथची किडनी आणि लिव्हर अहमदाबादच्या इंस्टिट्यूट ऑफ किडनी डीजीजेज अँड रिसर्च सेंटर इथे पाठवण्यात आलं आहे.
संबंधित बातमी : आराध्याला नवं जीवन! हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेक-गॅजेट
राजकारण
क्राईम
Advertisement