एक्स्प्लोर

मजुरांवर काळाचा घाला, दोन अपघातांमध्ये घरी निघालेल्या 14 मजुरांचा मृत्यू

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या सहनशिलतेचा बांध फुटला. हजारो स्थलांतरित मजूर गावाकडे पायपीट करत निघाले आहेत. या दरम्यान अपघात होऊन त्यात मजुरांचे जीव चालले आहेत.

मुजफ्फरनगर: लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांच्या सहनशिलतेचा बांध फुटला आहे. हजारो स्थलांतरित मजूर गावाकडे पायपीट करत निघाले आहेत. त्यातच मजूरांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये झालेल्या दोन अपघातांमध्ये घरी निघालेल्या 14 मजुरांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये एका बसने पायी जाणाऱ्या मजुरांना चिरडले आहे. या दुर्देवी घटनेत 6 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर 4 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार हे मजूर पंजाबहून पायी बिहारच्या गोपालगंज येथे चालले होते. ही घटना थाना नगर कोतवाली परिसरात मुजफ्फरनगर देवबंद सहारनपुर राजमार्ग टोलनाक्याजवळ घडली. माहितीनुसार बसचा ड्रायवर दारुच्या नशेत होता. घटनेनंतर बस ड्रायवरला अटक केली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत बुधवारी रात्री महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. लॉकडाऊननं सर्वात मोठा फटका मजूर आणि कामगारांना बसला आहे. गेल्या 51 दिवसांपासून देशभरात विविध ठिकाणी स्थलांतरीत कामगार अडकून पडले आहेत. उद्यापही लॉकडाऊन संपण्याची चिन्हे नसल्याने मजूर कुठल्याही मार्गा ने घरी जाण्याचा मार्ग निवडत आहेत. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर-सहारनपूर महामार्गावरुन बिहारमधील स्थलांतरित मजूर आपल्या घरी पायी निघाले असताना ही दुर्देवी घटना घडली. पायी निघालेल्या मजूरांच्या एका जत्थ्याला अचानक भरधाव बसने उडवलं. यातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या एका घटनेत बुधवारी रात्री महाराष्ट्रातून उत्तर प्रदेशकडे निघालेल्या मजुरांच्या ट्रकला झालेल्या भीषण अपघातात झाल्याने त्यात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 50 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. मध्यप्रदेशातील गुना येथे हा अपघात झाला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबादमध्ये 8 मे रोजी मालगाडीच्या धडकेत 16 मजुरांचा मृत्यू झाला होता.  जालना-औरंगाबाद मार्गावर करमाडजवळ हा अपघात घडला होता. हे सर्व मजूर जालन्यातून भुसावळला जात असतानाच पहाटे चार वाजता ही दुर्दैवी घटना घडली होती. हे सर्व मजूर जालन्यातील एका खाजगी कंपनीत काम करत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
Pakistan train hijack Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Krushna Andhale : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवालTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : 13 March 2025 : ABP MajhaNagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोधParinay Fuke:विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार, फुकेंनी सादर केली ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
Pakistan train hijack Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Video : पाकिस्तान रेल्वे हायजॅकचा थरारक व्हिडिओ समोर, बाॅलिवूड पिक्चर सुद्धा फिका पडेल असा फुल HD पिक्चर अन् कॅमेरा अँगलमध्ये व्हिडिओ रिलीज!
Krushna Andhale : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
नाशिकमध्ये सीसीटीव्हीत दिसलेला 'तो' कृष्णा आंधळे की दुसरा कोणी? दिवसभराच्या शोधमोहिमेनंतर पोलीस काय म्हणाले?
Reliance Share : 37 वर्षांपूर्वीचे रिलायन्सचे शेअर सापडले, 300 रुपयांच्या 30 शेअरचे बनले 11 लाख, आता तरुणानं घेतला मोठा निर्णय
साफसफाईत रिलायन्सचे 30 शेअर सापडले, दिवसभर चर्चा, 300 रुपयांचे बनले 11 लाख, तरुणाचा मोठा निर्णय
धक्कादायक, बारावीच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या!
धक्कादायक, बारावीच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या!
मल्टीबॅगर स्टॉकची किमया, गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश
मल्टीबॅगर स्टॉकची किमया, गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश
Car Prices in Pakistan : पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
पाकिस्तानात नवी सोडाच सेकंड हँड वॅगनार, अल्टोच्या किंमतीत भारतात नव्या किती थार घेता येतील? किंमत पाहून घाम फुटायची वेळ!
Embed widget