एक्स्प्लोर
हिमाचल प्रदेशात बस नदीत कोसळली, 14 जणांचा जागीच मृत्यू
शिमला : हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये बस कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली आहे. एक खासगी बस ब्यास नदीत कोसळून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 25 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना मंडीतील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
जखमींपैकी काही जणांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. प्राथमिक माहितीनुसार, मंडीजवळील बिंद्रामनी येथे ही दुर्घटना घडली.
मंडीहून खासगी बस दुपारी पावणे एकच्या सुमारास कुल्लूच्या दिशेने रवाना झाली. यावेळी बिद्रामनी येथे दुर्घटना घडली.
बसमध्ये एकूण 40 प्रवाशी होते. बसमधील एका प्रवाशाच्या माहितीनुसार, ओव्हरटेक करणाऱ्या बाईकला वाचवताना बस नदीत कोसळली. बिंद्रामनीजवळ बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने जवळपास 50 फूट खोल ब्यास नदीच्या किनाऱ्यावर बस कोसळली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बचावकार्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पावलं उचलण्यात आले आहेत. बचावकार्यासाठी टीम दाखल झाल्या असून, बचावकार्य सुरू आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement