(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत-चीन यांच्यात कमांडर स्तरावरील बैठकीची 11 वी फेरी, शांतता प्रस्थापित करण्यावर दोन्ही बाजूने सहमती
भारत-चीन दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली की त्यांच्या नेत्यांच्या सहमतीने मार्गदर्शन घेणे, उभय देशात संवाद सुरू ठेवणे आणि उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरणासाठी परस्परांना मान्य होणार्या मुद्यावर कार्य करणे आवश्यक आहे.
नवी दिल्ली : भारत-चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरच्या चर्चेची 11 वी फेरी बैठक 9 एप्रिल 2021 रोजी चुशुल-मोल्दो सीमा बैठक पॉईंटवर पार पडली. लडाखच्या पूर्व भागात असलेल्या प्रत्यक्ष सीमा रेषेजवळून सैन्य माघारी घेण्याबाबत उर्वरित प्रश्नांच्या निराकरणासाठी दोन्ही बाजूंनी सविस्तर चर्चा केली.
विद्यमान करार आणि प्रोटोकॉलच्या अनुषंगाने अनुत्तरीत प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज असल्याचं दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली गेली. या संदर्भात हे देखील अधोरेखित केले गेले की इतर भागातून सैन्य माघारी पूर्ण झाल्याने दोन बाजूंनी सैन्यामधील तणाव कमी होईल आणि शांतता प्रस्थापित करणे, द्विपक्षीय संबंधात प्रगती करण्यास सक्षम बनवणे याचा मार्ग मोकळा होईल.
11th round India-China Corps Commander Level Meeting was held at Chushul-Moldo border meeting point on 09 April. The two sides had a detailed exchange of views for the resolution of the remaining issues related to disengagement along the LAC in Eastern Ladakh: Defence Ministry
— ANI (@ANI) April 10, 2021
दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली की त्यांच्या नेत्यांच्या सहमतीने मार्गदर्शन घेणे, उभय देशात संवाद सुरू ठेवणे आणि उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरणासाठी परस्परांना मान्य होणार्या मुद्यावर कार्य करणे आवश्यक आहे. एकत्रितपणे सीमेवर स्थिरता राखण्यासाठी, कोणत्याही नवीन घटना टाळण्यास आणि सीमाभागात संयुक्तपणे शांतता राखण्यास उभयतांनी सहमती दर्शविली.
संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, सध्याचा करार आणि प्रोटोकॉलनुसार प्रश्न तातडीने सोडवण्याची गरज यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली. त्याचबरोबर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होईल आणि द्विपक्षीय संबंधात प्रगतीसुद्धा सुनिश्चित करेल.
मे 2020 मध्ये लडाखच्या सीमेवर चीनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे या दोन देशांच्या लष्करादरम्यान तणाव निर्माण झाला. गलवानच्या खोऱ्यात दोन्ही लष्करात हिंसक झडप होऊन त्यात भारताचे 20 सैनिक शहिद झाले होते. चीनचेही मोठे नुकसान झाले होते. त्याचसोबत हॉट स्प्रिंग, गोगरा आणि फिंगर एरिया मध्येही चीनी सैनिकानी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावरुनही दोन्ही सैनिकांत झडप झाली होती. या निमित्ताने गेल्या 45 वर्षात पहिल्यांदाच या दोन देशांच्या सीमेवर गोळीबाराची घटना घडली होती.