एक्स्प्लोर

Deck Based Fighters : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 100 स्वदेशी डेक बेस्ड फायटर जेट मिळणार

Aero India 2023 Deck Based Fighters : नौदलाकडे सध्या दोन स्वदेशी विमानवाहू जहाजे आहेत, ज्यांना सध्या 100 डेक-आधारित लढाऊ विमानांची आवश्यकता आहे.

Indian Navy Deck Based Fighter Jets : भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद वाढवण्यासाठी सरकारकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. येत्या काळात भारतीय नौदलाला 100 विमानांची गरज भासणार आहे. त्यासाठी 100 स्वदेशी लढाऊ विमानं (Fighter Planes) तयार केली जाणार आहेत. लवकरच या विमानांची रचना आणि विकासाचा प्रस्ताव सुरक्षाविषयक कॅबिनेट समिती समोर ठेवण्यात येईल. समिती या प्रस्तावावर महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बेंगळुरू येथे सुरू एअरो इंडियो शो 2023 (Aero India 2023) दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यानुसार, 2031-32 पर्यंत 100 स्वदेशी विमानं नौदलाचा भाग बनण्याची अपेक्षा आहे.

100 डेक-आधारित लढाऊ विमानांची आवश्यकता

भारतीय नौदलाकडे सध्या दोन स्वदेशी विमानवाहू जहाजे आहेत. यावर येत्या काळात 100 डेक-आधारित लढाऊ विमानांची आवश्यकता आहे. भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज INS विक्रांतसाठी नौदलाला 26 नवीन डेक-आधारित लढाऊ विमाने सज्ज केली जाणार आहेत. भारतीय नौदलाकडे सध्या दोन विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत आणि दुसरी INS विक्रमादित्य या आहेत. दरम्यान, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) ट्विन इंजिन डेच बेस्ड (TEDBF - Twin Engine Deck Based Fighter) प्रकल्पाचं डेल तयार करण्यात आलं आहे.

TEDBF फायटर जेट 2026 पर्यंत उड्डाण करण्याची शक्यता

एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक गिरीश एस. देवधर यांनी सांगितलं की, नौदलासाठी हलके लढाऊ विमान विकसित करण्यात आलेलं कौशल्य टीईडीबीएफ (TEDBF) प्रकल्पासाठी उपयुक्त ठरेल. हा प्रकल्प सध्या डिझाईन टप्प्यात आहे आणि लवकरच यामध्ये त्याची विंग फोल्डिंग डिझाइन यंत्रणा अंतिम करण्यात आली आहे. देवधर यांनी सांगितलं की, ट्विन-इंजिन डेक-आधारित फायटरचा पहिलं मॉडेल (TEDBF) 2026 पर्यंत पहिलं उड्डाण करण्याची शक्यता आहे आणि 2031 पर्यंत त्याचं उत्पादन सुरू होईल.

आशियातील सर्वात मोठा Air Show एअरो इंडिया 2023 

आशियातील सर्वात मोठ्या एअर शो (Air Show) सध्या भारतात सुरू आहे. पंतप्रधानांच्या हस्ते एअरो इंडिया 2023 चं उद्घाटन पार पडलं असून बंगळुरुमध्ये हा एअर इंडिया 2023 शो सुरू आहे. हा एअर शो 13 फेब्रुवारीला सुरू झाला असून 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामध्ये भारतीय सैन्याच्या हवाई दलाकडून उत्तम हवाई कसरतींचं दर्शन पाहायला मिळत आहे. एअरो इंडिया 2023 मध्ये जगाला भारताची ताकद दिसणार आहे. 

भारत लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, संरक्षण उपकरणे आणि आधुनिक युगातील एव्हीओनिक्स (Avionics) म्हणजेच हवाई क्षेत्रातील निर्मितीसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून नावारुपाला येताना दिसत आहे. या दृष्टीने 'एअरो इंडिया' शो फार महत्त्वाचा आहे. एअरो इंडिया 2023 मध्ये 80 हून अधिक देशांचा सहभाग दिसेल. सुमारे 30 देशांचे मंत्री आणि सीईओ या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

HAL Hanuman Image : HAL च्या HLFT-42 विमानावरील हनुमानाचा फोटो गायब, काय आहे प्रकरण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Embed widget