एक्स्प्लोर

LPG Gas Shortage: गॅस सिलिंडर अचानक संपण्याची भीती? घरबसल्या 'या' 3 सोप्या ट्रिक्सने लगेच करा चेक

LPG Gas Shortage: दिल्लीपासून मुंबईपर्यंत सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसची टंचाई जाणवत आहे.

LPG Gas Shortage: दिल्लीपासून मुंबईपर्यंत सध्या अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसची टंचाई जाणवत आहे. सतत वाढणारे गॅसचे दर, गॅसअभावी हॉटेल-ढाबे बंद होण्याची वेळ येणे, तसेच टपरीवरील चहाच्या किमतीतही वाढ झाल्याचे सातत्याने समोर येत आहेत. एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अशा परिस्थितीत जर अचानक स्वयंपाकघरातील गॅस संपला, तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते. विशेषतः घरात पाहुणे आले असतील किंवा घाईघाईत स्वयंपाक करायचा असेल, तर ही समस्या अधिकच त्रासदायक ठरते. अनेकदा लोकांना गॅस संपल्याचे तेव्हाच कळते, जेव्हा स्वयंपाक करताना अचानक चुलीची ज्वाळा बंद होते. मात्र, सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आधीच समजले, तर वेळेत नवीन सिलेंडर बुक करता येते आणि अशा अडचणींपासून सहज बचाव करता येतो. यासाठी एखाद्या खास मीटर किंवा मशीनची गरज भासेल, असे अजिबात नाही. काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही घरबसल्या सिलेंडर संपण्यापूर्वीच त्यामध्ये किती गॅस शिल्लक आहे हे सहज ओळखू शकतात.

1. पाण्याच्या मदतीने ओळखा गॅसचा स्तर

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे जाणून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाण्याची ट्रिक. यासाठी एका ग्लास किंवा मगमध्ये पाणी घ्या आणि सिलेंडरच्या वरपासून खालीपर्यंत हळूहळू ओता. त्यानंतर काही सेकंदांनी हाताने सिलेंडरला वरून खालीपर्यंत स्पर्श करून पाहा.

सिलेंडरला स्पर्श केल्यावर तुम्हाला जाणवेल की त्याचा काही भाग थंड आहे, तर काही भाग तुलनेने थोडा गरम आहे. ज्या भागापर्यंत सिलेंडर थंड वाटेल, त्या भागापर्यंत गॅस असल्याचे समजावे. असे होण्याचे कारण म्हणजे सिलेंडरच्या आत असलेली द्रवरूप एलपीजी उष्णता पटकन शोषून घेते, त्यामुळे त्या भागाच्या बाहेरील पृष्ठभाग थंड होते. जर थंड वाटणारा भाग खूप खालीपर्यंत असेल, तर समजून घ्या की गॅस लवकरच संपण्याच्या मार्गावर आहे.

2. सिलेंडरच्या वजनावरूनही लावता येतो अंदाज

तुम्हाला गॅस किती शिल्लक आहे याचा थोडा अधिक अचूक अंदाज घ्यायचा असेल, तर सिलेंडरचे वजन तपासण्याची पद्धतही उपयोगी ठरते. प्रत्येक एलपीजी सिलेंडरवर त्याचे रिकामे वजन (टॅर वेट) लिहिलेले असते. घरात वजन मोजण्याची मशीन असेल, तर सिलेंडर त्यावर ठेवून त्याचे एकूण वजन पाहू शकता. त्यानंतर एकूण वजनातून रिकामे वजन वजा करा. उदाहरणार्थ, सिलेंडरचे एकूण वजन 28.5 किलो आहे आणि त्यावर रिकामे वजन 15.5 किलो असे लिहिलेले आहे, तर त्यामध्ये सुमारे 13 किलो गॅस शिल्लक असल्याचा अंदाज लावता येतो.

3. गॅसच्या ज्वाळेवरूनही मिळू शकतो संकेत

सिलेंडरमधील गॅस कमी होऊ लागली की त्याचा परिणाम चुलीच्या ज्वाळेवरही दिसू लागतो. जर तुम्हाला आधीच्या तुलनेत गॅसची ज्वाळा कमी झाल्यासारखी वाटत असेल किंवा तिचा रंग निळ्या ऐवजी किंचित पिवळसर दिसत असेल, तर तो सिलेंडर लवकरच संपणार असल्याचा संकेत असू शकतो. अशा परिस्थितीत अनेकदा अन्न शिजण्यासाठीही जास्त वेळ लागतो. जर असे जाणवत असेल, तर तात्काळ नवीन सिलेंडर बुक करणेच योग्य ठरेल.

आणखी वाचा 

Israel-Iran War : इस्रायल- इराण युद्धादरम्यान अमेरिकेला जबर धक्का: लष्करी विमान KC-135 कोसळलं, शोध मोहीम सुरू, अपघाताचे कारण काय?

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात अचानक शिरलं पाणी आणि मलबा, ढिगाऱ्याखाली 18 कामगार अडकले, बाचवकार्य सुरु
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget