(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Olivier Dassault Death : राफेल कंपनीच्या मालकाचे हेलिकॉप्टर अपघातात निधन
फोर्ब्स 2020 च्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 361 व्या क्रमांकावर होते.सध्या ते सुट्टीवर होते. सुट्टीवर असताना त्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.
नवी दिल्ली : राफेल फायटर जेट विमानं बनवणाऱ्या कंपनीचे मालक ओलिविअर दसॉ यांचं हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. ते 69 वर्षांचे होते. 2020 फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते 361 व्या क्रमांकावर होते.सध्या ते सुट्टीवर होते. सुट्टीवर असताना त्यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनामुळे सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रोन यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन ट्वीटमध्ये म्हणाले, ओलिविअर दसॉ यांचे फ्रान्सवर अतिशय प्रेम होते. त्यांनी उद्योगपती, स्थानिक नवनिर्वाचित अधिकारी, लोकप्रतिनिधी, वायू सेनेचे कमांडर म्हणून देशाची सेवा केली. त्यांच्या मृत्यूमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे.
Olivier Dassault aimait la France. Capitaine d’industrie, député, élu local, commandant de réserve dans l’armée de l’air : sa vie durant, il ne cessa de servir notre pays, d’en valoriser les atouts. Son décès brutal est une grande perte. Pensées à sa famille et à ses proches.
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) March 7, 2021
ओलिवियर दसॉ हे फ्रान्समधील उद्योगपती आणि अब्जाधीश असणाऱ्या सर्ज दसॉ यांचे पुत्र होते. त्यांच्या कंपनीत राफेल फायटर विमाने बनवण्यात येत होती. फ्रान्समधील संसदेचे सदस्य असल्याने राजकारण आणि उद्योग यांमध्ये एकमेकांचा प्रभाव पडू नये म्हणून त्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय मंडळावरुन पदाचा राजीनामा दिला होता. 2020 च्या फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दसॉ यांना त्यांच्या भावंडासोबत 361 वे स्थान मिळाले होतं.
2002 साली फ्रानसच्या नॅशनल अॅस्मेबलीसाठी निवड करण्यात आली होती. फ्रान्सच्या ओएस एरियाचे प्रतिनिधित्व करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दसॉ यांच्यासोबतच या हेलिकॉप्टरमधील चालकाचाही मृत्यू झाला आहे. परंतु हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण समोर आलेले नाही.