एक्स्प्लोर

फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक!

फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत.शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील.

नवी दिल्ली : फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला वैमानिक बनल्या आहेत. शिवांगी सिंह यांना राफेल विमानाच्या स्क्वॉड्रनची पहली महिला वैमानिक बनण्याचा मान मिळाला आहे. देशातील सर्वात शक्तिशाली राफेल विमान उडवण्याची जबाबदारी मिळाली आहे. लेकीच्या या सन्मानानंतर त्यांच्या कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. शिवाय त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. योगायोग म्हणेज मागील वर्षी डिसेंबरमध्ये शिवांगी नावाचीच महिला भारतीय नौदलातील पहिल्या वैमानिक बनल्या होत्या.

कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण होताच राफेलमधून उड्डाण करणार उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या असलेल्या शिवांगी सिंह कन्वर्जन ट्रेनिंग पूर्ण करताच हवाई दलाच्या अंबाला एअरबेसमधील 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनमध्ये औपचारिक प्रवेश करतील. एखाद्या वैमानिकाला एका लढाऊ विमानातून दुसऱ्या लढाऊ विमानात स्वीच करण्यासाठी कन्वर्जन ट्रेनिंग घेण्याची आवश्यता असते. सध्या त्या मिग 21 या लढाऊ विमानाच्या वैमानिक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी राफेल उडवणं तेवढं आव्हानात्मक नसेल, कारण ताशी 340 किमीवेग असलेलं मिग-21 हे जगातील दुसरं सर्वात जलद लॅण्डिंग आणि टेकऑफ स्पीड असलेलं विमान आहे.

लवकरच राफेल उडवणार शिवांगी सिंह बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून शिक्षण पूर्ण केलेल्या फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह या महिला वैमानिकांच्या दुसऱ्या बॅडमधील आहे, ज्याचं कमिशनिंग 2017 झालं. भारतील हवाई दलाच 10 महिला वैमानिक आहे, ज्यांनी सुपरसॉनिक विमानं उडवण्याचं कठोर प्रशिक्षण घेतलं आहे. शिवांगी सिंह यांना लढाऊ वैमानिक बनण्याची प्रेरणा आपल्या आजोबांकडून मिळाली, जे सैन्यात कर्नल होते. फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह आधी राजस्थानच्या फॉरवर्ड फायटरमध्ये तैनात होत्या, जिथे त्यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्यासह उड्डाण केलं होतं. लवकरच त्या राफेल लढाऊ विमानाचं उड्डाण करणार आहेत.

फ्रान्समधून आलेल्या पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच 10 सप्टेंबर रोजी अंबाला एअरबेसवर औपचारिकरित्या भारतीय हवाई दलात सामील झाली होती. ही विमानं हवाई दलाच्या 17 गोल्डन एरोज स्क्वॉड्रनचा भाग बनली.

चीनसोबत तणाव असताना लडाखमध्ये राफेल तैनात चीनसोबत सुरु असलेल्या तणावादरम्यानच भारतीय हवाई दलाने राफेल विमानं एलएसीवर तैनात केली आहेत. लेह-लडाखवर राफेल कॉम्बेट एअर पेट्रोलिंग करताना दिसतात. चीनजवळच्या एलएसीवर भारतीय हवाई दलाची लढाऊ विमानं दिवस-रात्र एअर कॉम्बेट पेट्रोलिंग करत आहेत.

भारताने फ्रान्सस‌ोबत 36 राफेल लढाऊ विमानांचा करार केला होता. त्यापैकी पाच विमानांची पहिली बॅच भारतात पोहोचली असून हवाई दलाच्या अंबालामधील गोल्डन ऐरो स्क्वॉड्रनमध्ये सामील झाली आहेत. आणखी पाच विमानं पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये भारतात येणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार

Embed widget