India Pak War: युद्धाच्या नुसत्या कल्पनेने पाकिस्तानला थरकाप; निवृत्त कर्नल अभय पटवर्धनांनी सांगितली भारतीय लष्कराची जमेची बाजू
India Pak War : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्या विरोधात पाकिस्थान सैन्यामध्येच विरोधाचा सुरु उमटणे हे भारतासाठी जमेची बाजू असल्याचे मत निवृत्त कर्नल अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं आहे.

India Pak War : पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर (Asim Munir) यांच्या विरोधात पाकिस्थान सैन्यामध्येच विरोधाचा सुरु उमटणे हे भारतासाठी जमेची बाजू आहे. पाकिस्थान सेनेत (Pakistan Army) राजीनामा सत्र सुरु झाले आहे, युद्ध सुरु होण्या आधी पाकिस्थान सेनेतील उच्च पदस्थ अधिकारी आपल्या कुटुंबातील सदस्यांना विदेशात पाठवले आहे. यातून पाकिस्थान सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचे मत रक्षा क्षेत्राचे अभ्यासक निवृत्त कर्नल अभय पटवर्धन (Retired Colonel Abhay Patwardhan) यांनी व्यक्त केलं आहे.
पाकिस्तानच्या केवळ चीन आणि तुर्कीस्थानच्या जोरावर कोलांट्याउड्या- अभय देशपांडे
असीम मुनीर हे अंडर मेथडने लष्कर प्रमुख बनले आहे. त्यामुळे त्यांच्या सोबत पाकिस्तानचे लष्कर पण नाही व राजकीय पाठबळ पण नाही, असे दिसत असल्याचे मत ही कर्नल देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. सध्या पाकिस्तान चीन आणि तुर्कीस्थानच्या जोरावर कोलांट्याउड्या मारत आहे. तुर्कीस्थान पाकिस्तानला आपले ड्रोन देऊ शकतो, मात्र भारताचं एअर डिफेन्स सिस्टम मजबूत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्ध झालं तर त्याचा फारसा फरक पडेल, असे वाटत नसल्याचेही अभय पटवर्धन म्हणाले. पहलगाम हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाला असतांना उत्पन्न झालेल्या युद्धजन्य परिस्थितीवर निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी ही माहिती दिली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतंप्रधान नरेंद्र मोदींसोबत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर, भारताने पाकिस्तानची कोंडी करणारे 5 महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामध्ये, पाकिस्तानची पाणी कोंडी करत सिंधू जल वाटप कराराला स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय पाकिस्तानवर लगेच परिणाम करणारा ठरणार नाही. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबरनंतर त्याचे विपरीत परिणाम पाकिस्तानी शेतकरी आणि सामान्य जनतेवर होईल, असे मत संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केले आहे.
अभय पटवर्धन म्हणाले की, पाकिस्तानवर सिंधू नदी करार रद्द करून तातडीने परिणाम आणण्यासाठी आवश्यक मोठे धरण आपल्याकडे नाही. सिंधू नदीवर एकच मोठा धरण आहे. मात्र, त्यामध्ये भारत एका क्षमतेपर्यंतच पाणी थांबवू शकतो. तसंही पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातला गहू आणि मक्याचा यंदाचा पीक आता कापणीवर आला आहे. त्याला पाण्याची फारशी गरज नाही. येणाऱ्या हंगामात होणाऱ्या पेरणीला मात्र सप्टेंबर पासून पाण्याची गरज भासेल आणि तेव्हा भारताने अडवलेलं पाणी पाकिस्तानाला अडचणीचं ठरेल. असेही त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा
























