एक्स्प्लोर

Pahalgam Attack: "इंडियन आर्मीने सुरुवात केलेय, शेवट आम्ही करु!"; दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर KRF संघटनेची दर्पोक्ती

Pahalgam Terror Attack: भरतीय लष्कराच्या कारवाईचा धसका आता काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेले दहशतवादी संघटना काश्मीर रेझिस्टन्स फ्रंटने घेतलाय. परिणामी या संघटनेकडून धमकीचा ऑडिओ संदेश जारी करण्यात आलाय.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu & Kashmir) पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग हादरलंय. 22 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यानंतर भारताने कारवाई करत सिंधू नदी करार रद्द केला आणि पाकिस्तान विरोधात अनेक कठोर पावले उचलायला सुरुवात केलीय. त्यामुळे पाकिस्तानात भीतीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) सुरक्षा दलाने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई सुरू केली असून काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली जात आहे.

या कारवाईत आतापर्यंत 9 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली असून अनेक संशयित सुरक्षा दलाच्या रडारवर आसल्याची माहिती आहे. एकीकडे भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली असताना दहशतवाद्यांची पायाखालची वाळू सरकली असून सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशातच या लष्कराच्या कारवाईचा धसका आता काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेले दहशतवादी संघटना काश्मीर रेझिस्टन्स फ्रंटने (Kashmir Resistance Front)  घेतला आहे. परिणामी या संघटनेकडून धमकीचा ऑडिओ संदेश जारी करत भारताला इशारा देण्यात आला आहे.

दहशतवाद्यांची घरं पाडल्यानंतर KRF संघटनेची दर्पोक्ती

काश्मीर रेझिस्टन्स फ्रंट (KRF) या दहशतवादी संघटनेने अहमद सालार नावाच्या एका दहशतवाद्याचा ऑडिओ संदेश जारी केला आहे. या ऑडिओमध्ये, सालार पोलीस आणि सुरक्षा दलांना धमक्या देत असून दहशतवाद्यांची घरे पाडल्याबद्दल बदला घेण्याची चेतावणी यातून देण्यात आली आहे. "उद्ध्वस्त झालेल्या प्रत्येक घरासाठी, एक घर लक्ष्य केले जाईल आणि प्रत्येक बाधित कुटुंबासाठी, त्यांच्या कुटुंबांना लक्ष्य केले जाईल."  "हे सुरक्षा दलांनी सुरू केले होते; आम्हीच ते संपवू." असे ऑडिओ क्लिप मध्ये बोलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, यापूर्वी ही अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले होते, ज्यामुळे जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात राजीनामे देण्यात आले होते. 

मात्र आता परिस्थिती पूर्णता: वेगळी असून पाकिस्तानात लपून पोकळ धमक्या देणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आकांना आता कुणीही भीक घालणार नाही, असा सुरूही कानी पडतो आहे. त्यामुळे असल्या धमकी आणि वल्गनांना भारतीय सुरक्षा दलांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जावं, हीच प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.

पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार सुरूच 

दुसरीकडे पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर सुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सातत्याने चकमकी होत आहेत. 
अशातच 27-28 एप्रिल 2025 च्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी विनाकारण लहान शस्त्रांनी गोळीबार सुरू केलाय. याला भारतीय सैन्यानेही जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले असल्याची माहिती भारतीय सैन्याने दिली आहे. निवेदन सादर करत त्यांनी ही माहिती दिली आहे.

हे ही वाचा 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
ग्राहक बनून आल्या, दीड किलो सोनं चोरुन गेल्या! छत्रपती संभीजनगरमध्ये बुरखाधारी महिलांकडून हादरवणारी चोरी
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
धक्कादायक! परळीत 23 वर्षीय तुलसीने संपवलं जीवन; जीम ट्रेनर म्हणून होती कार्यरत, परिसरात हळहळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
सुट्टे तेल विकू नका, घेऊ नका; आता, खाद्य तेलाकडे तुकाराम मुंढेंचा मोर्चा, विक्रेत्यांना इशारा, 7 वर्षापर्यंतची शिक्षा
Embed widget