एक्स्प्लोर
लडाखच्या तणावादरम्यान शीघ्र प्रतिसाद दिल्याबद्दल हवाई दल प्रमुखांनी केली हवाई योद्धांची प्रशंसा
88 व्या वायुसेना दिनानिमित्त बोलताना हवाई दल प्रमुख भदोरीया यांनी भारतीय हवाई दलाने लडाख तणावादरम्यान दाखवलेल्या इच्छाशक्ती आणि कार्यक्षमतेचे कौतुक केले.

गाझियाबाद: भारतीय हवाई दल हे सर्व परिस्थितीत देशाच्या सार्वभौमत्वाचे आणि हितसंबंधाचे रक्षण करण्यास सुसज्ज असल्याचे हवाई दल प्रमुख राकेश कुमार सिंग भदोरिया यांनी सांगितले. ते हवाई दलाच्या 88 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंडन एअरबेसवर आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. ते पुढे म्हणाले की आपल्या 89 व्या वर्षात पदार्पण करताना भारतीय हवाई दल हे महत्वाच्या संक्रमणातून जात आहे. आपण अशा काळातून जात आहोत जो यापुढील काळातील आकाशातील शक्तीचा कशा प्रकारे वापर करायचा आणि एकात्मिक बहुक्षेत्रीय कार्यक्रम कसा राबवायचा परिभाषित करेल. हे वर्ष अभूतपूर्व आहे. जगभर कोरोनाचा प्रसार वाढत आहे. पण याला आपल्या देशाने धाडसाने तोंड दिले आहे असेही ते म्हणाले. उत्तर सीमेवरील तणावादरम्यान हवाई दलाने जो शीघ्र प्रतिसाद दिला त्याचे मी कौतुक करतो. आम्ही भारतीय लष्कराला कोणत्याही परिस्थितीत कोणतीही मदत पुरवण्यासाठी आणि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सुसज्ज राहण्यासाठी आमची लढावू सामग्री अगदी कमी काळात तैनात केली असे ते म्हणाले. याप्रसंगी चीप ऑफ स्टाफ डिफेन्स जनरल बिपीन रावत, लष्कर प्रमुख मनोज नरवणे आणि नौदल प्रमुख अॅडमिरल करंबिर सिंग हे उपस्थित होते. हवाई दलाचा 88 वा वर्धापन दिन परेड सोहळा राकेश कुमार भदोरिया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. लडाखच्या परिसरात गेले काही महिन्यांपासून भारत आणि चीन दरम्यान तणाव सुरू आहे. या परिसरात भारतीय लष्कराने आपले मोठे सैन्य आणि महत्वपूर्ण लष्करी सामग्री तैनात केली आहे. गाझियाबादच्या हिंडन येथील हवाई दलाच्या 88 व्या वर्धापन दिनानिमित्त हवाई दलाने धाडसी कवायती सादर केल्या. त्यात राफेलसह अनेक लढावू विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी भाग घेतला आणि चित्तथरारक कसरती सादर केल्या. IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस, हिंडन एअरबेसवर वायुदलाची ताकद दिसणार!
संबंधीत बातम्या :
हवाई दलात सुरू असलेल्या आधुनिकीकरणाच्या प्रक्रियामुळे भारतीय हवाई दल हे सामर्थ्यवान बनेल: राष्ट्रपती
IAF Day 2020 | भारतीय हवाई दलाचा 88वा स्थापना दिवस, हिंडन एअरबेसवर वायुदलाची ताकद दिसणार! " " -
" "
-
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
महाराष्ट्र
राजकारण























