एक्स्प्लोर
Advertisement
कोणत्या जिल्ह्यात किती तूर शिल्लक, किती विक्री?
मुंबई : नाफेडने तूर खरेदी बंद केल्यानंतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये अजूनही लाखो क्विंटल तूर शिल्लक आहे. शिवाय तुरीची आवकही अजून चालूच आहे. शेतकऱ्यांना आता तूर खरेदीच्या सरकारच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे. तोपर्यंत वाट पाहण्याव्यतिरिक्त शेतकऱ्यांकडे पर्याय उरलेला नाही.
नाफेडने तूर खरेदी थांबवल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत.
दरम्यान उद्या (मंगळवार) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत तूर खरेदीबाबत मोठा निर्णय होऊ शकतो. सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी याबाबत संकेत दिले आहेत.
कोणत्या बाजार समितीत किती तूर शिल्लक?
- अमरावती - अचलपूर बाजार समितीत 40 हजार क्विंटल खरेदी झाली आहे. तर 25 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- सोलापूर - माढा बाजार समितीत 19 हजार 700 क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 5 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- लातूर - लातूर, चाकूर, जळकोट बाजार समित्यांमध्ये 75 हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक आहे.
- उस्मानाबाद - बाजार समितीमध्ये 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.
- अहमदनगर - बाजार समितीमध्ये 2 लाख 7 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. 25 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- नांदेड - बाजार समितीमध्ये 1 लाख 12 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 20 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- जालना - बाजार समितीमध्ये 1 लाख 42 हजार 665 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 29 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- धुळे - बाजार समितीमध्ये 29 हजार 794 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 400 क्विंटल तूर शिल्लक.
- नंदुरबार - बाजार समितीमध्ये 28 हजार 405 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 4 हजार क्विंटल तूर शिल्लक.
- बीड - बाजार समितीमध्ये 2 लाख 80 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटल तूर शिल्लक.
- अकोला - सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून आतापर्यंत 2 लाख 58 हजार 388 क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.
- वर्धा - जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 14 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 1 लाख क्विंटलपेक्षा जास्त तूर शिल्लक.
- यवतमाळ - जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये मिळून 1 लाख 32 हजार क्विंटल तूर खरेदी झाली. तर 3 लाख 75 हजारांपेक्षा जास्त तूर शिल्लक.
सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय
काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च
तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना
नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
क्रीडा
Advertisement