एक्स्प्लोर

Horoscope Today 8 April 2024 : तूळ, वृश्चिक आणि धनु राशीच्या इच्छा होणार पूर्ण; नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 8 April 2024 : तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 8 April 2024 : राशीभविष्यानुसार आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.... 

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे, तुमच्यावर अतिरिक्त कामाचा ताण येऊ शकतो. ग्रहण दोष निर्माण झाल्यामुळे नोकरदार लोक ऑफिसमध्ये काम करण्यात थोडा आळस दाखवू शकतात, ते काम करतील परंतु पूर्ण मनाने नाही.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, गुंतवणूकदार तुमच्या व्यवसायात रस दाखवू शकतात, परंतु तुम्ही विचार करूनच भागीदारीत व्यवसाय करावा. व्यावसायिकांना महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल, अपेक्षित कामं वेळेवर पूर्ण होतील.

विद्यार्थी (Student) - आज तुम्हाला काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल, ज्यात तुम्ही उत्साहाने सहभागी व्हाल. होळीच्या सणादरम्यान तुमच्या काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला त्रास देऊ शकतात.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमची तब्येत बिघडू शकते. तब्येत बिघडल्यामुळे तुमचा स्वभाव खूप चिडचिडा होईल, यामुळे तुमचे कुटुंबीय तुमच्यावर रागवतील.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - नोकरीत बढती किंवा बदली होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यावेळी तुम्ही तुमचं कौशल्य सुधारण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.

व्यवसाय (Business) - बुधादित्य योग आणि वृद्धी योग तयार झाल्यामुळे व्यवसायातील मालमत्तेत वाढ होईल आणि तुम्ही योग्य नियोजन करून प्रत्येक काम करू शकाल. व्यावसायिकांसाठी काळ चांगला ठरणार आहे. आज व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही अडकलेले पैसे मिळू शकतात.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतात. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. फक्त खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, बुधादित्य, वृद्धी योग तयार झाल्यामुळे तुमचा बॉस तुमच्या कामाने प्रभावित होऊन तुमचा पगार वाढवू शकतो. तुमच्या कामात तुम्हाला मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या व्यवसाय आज चांगला चालेल, ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्यासाठी हा जुन्या गोष्टी सोडून व्यवसायात पुढे जाण्याचा दिवस आहे. ग्रहांचा खेळ पाहता व्यावसायिकांनी फायदेशीर व्यवहारांकडे अधिक लक्ष द्यावं.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे. नवीन पिढीला नकारात्मक गोष्टींपासून दूर राहावं लागेल, त्यांचे मन त्यांना भविष्यात नुकसान होईल अशा गोष्टी करायला सांगेल. उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे, तुम्हाला एखाद्या चांगल्या महाविद्यालयातून ऑफर मिळू शकते.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम मोडू नका, अन्यथा तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Pisces weekly Horoscope 8 To 14 April 2024 : मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अतिशय शुभ, कमवाल बक्कळ धन-दौलत; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve : शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
Sushma Andhare: प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं
प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manikrao Kokate : सत्र न्यायालयात माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळणार का?Sushma Andhare FULL PC :Neelam Gorheयांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार,सुषमा अंधारे कडाडल्याABP Majha Headlines : 03 PM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRamdas Kadam on Sanjay Raut : मातोश्रीवर आम्ही किती मिठाईचे बाॅक्स पोहचवले हे माहित नाही का ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve : शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
शिरसाट हे गुत्तेदार, मुंबईत 72 व्या मजल्यावर फ्लॅट, दोन-दोन कोटींच्या गाड्या कशा कमावल्या? माझ्या नादी लागू नका नाहीतर... अंबादास दानवेंचा इशारा
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
उष्माघाताचा पहिला बळी सांगलीत, गॅरेगारविक्रेत्याचा मृत्यू; कडक उन्हामुळे भोवळ येऊन उलट्या
Sushma Andhare: प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं
प्रकाश आंबेडकरांसोबत काम करताना ते आतापर्यंत काय काय केलं, हे बाहेर काढेन, सुषमा अंधारेंचा नीलम गोऱ्हेंना बेधडक इशारा, 10 मोठी विधानं
Manikrao Kokate : कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ, जुन्या वैर्‍याची लेक उतरली मैदानात, घेतला मोठा निर्णय
नवनीत हाती आले हो, रिक्षात बसून कॉपी केली होsss, शिक्षक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल; चौकशी सुरू
नवनीत हाती आले हो, रिक्षात बसून कॉपी केली होsss, शिक्षक अन् 10 वीच्या विद्यार्थ्याचा व्हिडिओ व्हायरल; चौकशी सुरू
Stock Market : 15 रुपयांचा शेअर 2000 रुपयांवर पोहोचला 1 लाखांचे बनले एक कोटी, गुंतवणूकदार मालामाल
15 रुपयांच्या शेअरमुळं गुंतवणूकदार बनले कोट्याधीश, गुंतवणूकदारंना मालामाल करणारा शेअर किती रुपयांवर?
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
गज्या मारणे गँगवर मकोका लावला , पुणे पोलिसांनी काढली धिंड; हाती बेड्या, तोंडाला काळं बांधून शहरातून फिरवलं
Ashok Harnawal on Neelam Gorhe : निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
निलम गोऱ्हे विधिमंडळात लक्षवेधी आणून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायच्या; राऊतांनी उल्लेख केलेल्या पुण्यातील अशोक हरणावळांचा खळबळजनक आरोप
Embed widget