Horoscope Today 08 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार बाप्पाची कृपा; अडकलेली कामं लागणार मार्गी, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 08 October 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 08 October 2024 : पंचांगानुसार, आज 08 ऑक्टोबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज दुसऱ्याच्या मताशी सहजासहजी तुम्ही सहमत होणार नाही.
वृषभ (Taurus Horoscope Today)
शब्द हे शस्त्र आहे याची जाणीव ठेवावी लागेल. थोडी मानसिक अस्थिरता ही जाणवेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
सर्व परिस्थितीमध्ये शांत राहण्यासाठी उपासना मार्गाचा अवलंब केल्यास फायदा होईल.
कर्क (Cancer Horoscope Today)
तुमच्या चौकस स्वभावामुळे अनेक ठिकाणच्या बातम्या मिळवाल.
सिंह (Leo Horoscope Today)
ज्यांचा उपयोग तुम्हाला तुमच्या कामांमध्ये करता येईल अशा लोकांशी ओळखी होतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
कलाकारांच्या जीवनात स्फूर्तीदायक घटना घडतील. महिलांना पोषक ग्रहमान लाभेल.
तूळ (Libra Horoscope Today)
गुढशास्त्र मंत्रशास्त्र विषयांचा अभ्यास करणाऱ्यांना चांगले ग्रहमान आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
आज खूप कष्ट कराल, परंतु कोणतीही गोष्ट आंधळेपणाने करत नाही ना याचा विचार करा.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आज तुमच्या पुढे कोणी आवाज उठवू शकणार नाही.
मकर (Capricorn Horoscope Today)
लेखकांना परखड लेखन करण्यासाठी काळ चांगला आहे. आता जे लेखन कराल त्याला प्रसिद्धी मिळेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
घरात हलकेफुलके आणि प्रेमळ वातावरण राहील. घरात पाहुण्यांची ये-जा राहील.
मीन (Pisces Horoscope Today)
आज मुलांशी पटणे कठीण वाटते. दोन पिढ्यांमधील अंतर इथे तुम्हाला चांगलेच जाणवेल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: