(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hingoli News : हिंगोली गोळीबार प्रकरणातील दोन आरोपी वॉन्टेड घोषित, आरोपींची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचं बक्षीस
Hingoli Wanted : हिंगोली गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आलं असून आरोपीची माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
Hingoli Crime News : हिंगोली शहरातील गोळीबार प्रकरणातील फरार असलेल्या दोन आरोपींना वॉन्टेड घोषित करण्यात आलं आहे. आरोपींची माहिती देणाऱ्याला हिंगोली पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. हिंगोली शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराची राज्यभर चर्चा सुरू आहे.
दोन आरोपींची माहिती देणाऱ्यांना 25 हजारांचं बक्षीस
या गोळीबाराच्या घटनेमध्ये पोलिसांकडून एकूण पाच आरोपी निष्पन्न झाले असून यापैकी तीन आरोपी पोलिसांनी अटक सुद्धा केली आहे. पण मुख्य आरोपी असलेला अक्षय इंदोरिया आणि ओम पवार हे दोन आरोपी अजूनही फरार आहेत. दरम्यान, पोलिसांच्या वतीने या दोन आरोपींचा शोध घेतला जात आहे. परंतु आरोपी सापडत नसल्याने हिंगोली पोलिसांनी या दोन आरोपींना आज वॉन्टेड घोषित केले आहे. या आरोपींची माहिती देणाऱ्याला पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन हिंगोली पोलिसांच्या वतीने करण्यात आलं आहे.
हल्ल्यात संतोष बांगर यांचा हात, पप्पू चव्हाण यांचा आरोप
हिंगोलीमध्ये जिल्हा परिषद कार्यालय समोर भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या पाठीवर दोन गोळ्या लागल्या आहेत. मंगळवारी, 1 ऑगस्ट रोजी ही घटना घडली. दरम्यान, या हल्ल्यात कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम यांचा हात आहे, असा आरोप पप्पू चव्हाण यांनी केला आहे. माझ्यावर हल्ला झाला आहे. पोलिसांनी माझा जबाब घेऊन कारवाई करणं अपेक्षित आसताना पोलिसांनी तसं केले नाही, त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांनी केली आहे.
पाच आरोपी, तिघे पोलिसांच्या ताब्यात; दोघांचा शोध सुरू
हिंगोली शहरांमध्ये भरदिवसा गोळीबार करण्यात आला होता, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला असून त्यांना दोन गोळ्या पाठीवर लागल्या आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याप्रकरणी हिंगोली पोलिसांनी तात्काळ तपास करत एकूण पाच आरोपी असल्याचं निष्पन्न केले आहे. यामधील तीन आरोपींना ताब्यात घेतले असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे. वैयक्तिक कारणातून पप्पू चव्हाण यांच्यावर हा हल्ला झाला असल्याचा पोलिसांनी सांगितला आहे. तर, या हल्ल्यामागे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर व त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप पप्पू चव्हाण यांनी केला आहे.
हिंगोलीतील गोळीबाराचा प्रश्न विधासभेत
हिंगोली शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर भर दिवसा भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. दोन गोळ्या पप्पू चव्हाण यांच्या पाठीत लागल्या असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. या घटनेची सीआयडी चौकशी करावी. अशी मागणी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी आज विधानसभेत केली आहे. पप्पू चव्हाण यांच्यावर कोणी हा हल्ला केला आहे. त्याची सीआयडी चौकशी करावी. अशी मागणी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी केली आहे.