एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पीक संरक्षणासाठी जालन्यातील शेतकऱ्याचा ‘हायटेक’ जुगाड !
जालना : शेती व्यवसायात चांगल्या उत्पन्नाबरोबरच कष्ट कमी व्हावेत म्हणून शेतकऱ्यांकडून वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी अनेक खटाटोपी केल्या जातात. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक येथील दतात्रय दहिफळे या शेतकऱ्याने पिंकाच्या संरक्षणासाठी एक छोटासा अभिनव प्रयोग केला आहे. आपल्या पिकांचं वन्य प्राणी आणि पक्षापासून संरक्षण व्हावं म्हणून टाकाऊ वस्तूंपासून हवेवर चालणाऱ्या यंत्राचा उपयोग करून प्राणी आणि पक्षाच्या आक्रमणापासून पिंकाचा बचाव केला आहे.
शेतात काबाड-कष्ट करत लाख मोलाच बियाण खरेदी करून बियाणाची उगवणीपासून ते पिकांची वाढ होईपर्यंत बळीराजाला मोठी काळजी घ्यावी लागते. शेतात हरीण, मोर, रानडुकरं यासारखे वन्यप्राणी पिकात घुसून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. एका अंदाजाप्रमाणे त्यामुळे पिकांचं 20 ते 25 टक्के नुकसान होत, परिणामी उत्पादन घटून मोठा आर्थिक फटका देखील शेतकऱ्याला सहन करावा लागतो. यामुळे शेतकरी हैराण होतात. असाच फटका आणि उत्पन्नतील घट अनुभवणाऱ्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या पिंपरखेड बुद्रुक गावच्या दत्तात्रय दहिफळेंनी पीक संरक्षणासाठी वेळ पैसा आणि मेहनत वाचवणारा प्रयोग केला. दत्तात्रय यांनी शेतात बुजगावण्याला दाद न देणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांचा बंदोबस्त कारण्यासाठी टाकाऊ पंखा, एक प्लेट (परात) आणि कागदी पुठ्ठयांच्या सहाय्याने हवेवर चालणारं हे जुगाड यंत्र तयार केलं. यात यंत्राच्या सहाय्याने हवेद्वारे पंखा फिरून त्याचे परातीला घर्षण होत साहजिकच याचा सातत्याने मोठा आवाज होत असल्याने शेतात पक्षी आणि प्राण्यांचा वावर बंद झाला आहे.
दत्तात्रय दहिफळे
दत्तात्रय दहिफळे यांना उत्पन्नात वन्यप्राणी व पक्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. यासाठी कायमचा काही तरी उपाय झाला पाहिजे. हा विचार करता, त्यांना एक कल्पना सुचली. याच्यासाठी त्यांनी जुना खराब झालेला पंखा घेऊन त्याला एक परात बसवली आणि नटबोल्टच्या सहाय्याने एका बाजूला कागदी जाड पुठ्ठा बसवला. जेणेकरून वारा आला की पुठ्ठयाच्या सहाय्याने पंखा फिरतो. त्यामुळे मोठा आवाज होतो. या यंत्राच्या आवाजामुळे पक्षी आणि वन्यप्राणी पिकाकडे फिरकत नाहीत.
आजच्या घडीला पक्षी वन्यप्राण्यापासून पिंकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याकडून बऱ्याच खटाटोपी केल्या जातात. कधी शेतात बुजगावणी उभे करणे, कधी फटाक्याचा आवाज करून पाखरं आणि प्राणी पळविणे. तर कधी पिका भोवती तार कंपाऊंड करून त्यात वीज सोडणे, अनेक वेळा उभ्या पिकात माळ तयार करून त्यावरून हवेत गोफणीद्वारे दगडही भिरकावले जातात. हे सगळे उद्योग केले जातात जेणेकरून आवाजाने पक्षी व वन्यप्राणी पळून जाऊन पिकांचं होणार नुकसान टळेल.
अर्थात यासाठी लागणार मनुष्यबळ आणि जोडीला होणारा नाहक त्रास, शिवाय यातली गंभीर बाब म्हणजे या उपायापासून होणारा धोका टाळण्यासाठी दत्तात्रय दहिफळे यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी शेवटी एक जुगाड केलंच. आज या जुगाडामुळे त्यांच्या 8 एकरावरील पिकाचं संरक्षण होऊ लागलं आहे.
दतात्रय यांनी बनविलेले हवेवर चालणारं हे यंत्र जिल्ह्यातील इतर शेतकऱ्याना फायदेशीर ठरत असल्याने यांची मागणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाकडून होत आहे. तसेच यासाठी कमी खर्च लागत असल्याने शेतकऱ्याच्या खिशाला परवडणारे असल्याने शेतकरी दत्तात्रय च्या शेतावर गर्दी करू लागले आहेत.
दत्तात्रय चा हा प्रयोग व्हॉट्सअप सारख्या सोशल मीडियावरही गाजू लागला आहे. साहजिकच अनेकांनी व्हॉट्सअप वर पाहून हे जुगाड आपल्या शेतात देखील तयार केलं. त्यांना देखील याचा चांगला अनुभव येत आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यानी हे यंत्र आपल्या शेतात तयार करून पिंकाचे नुकसान वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. यंत्राच्या आवाजामुळे वन्यप्राणी व पक्षी पळू लागले. त्यामुळे शेतकरी आत्ता बिनधास्त झाले आहेत.
दत्तात्रय यांनी तयार केलेल्या हवेवर चालणाऱ्या या जुगाड यंत्रात कसलाही धोका नाही. शिवाय यापासून वेळ आणी पैशाची देखील बचत होऊ लागली आहे. साहजिकच शेतकरी वर्गासाठी काही प्रमाणात का होईना हा प्रयोग फायद्याचा ठरू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement