Hema Malini : त्यांनी भारतीयांची माफी मागावी राहुल गांधी यांच्या 'त्या' वक्तव्यावर हेमा मालिनींची टीका
Hema Malini : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या भारतीय लोकशाहीबाबतच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
Hema Malini : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) यांनी एबीपी न्युजला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लंडनमध्ये केलेल्या भारतीय लोकशाहीबाबतच्या वक्तव्यावर टीका केली आहे. तसेच रामायण पाठ करण्याचा योगी सरकारचा निर्णय, नद्यांचे प्रदूषण आणि मोदी सरकारचे प्रयत्न अशा अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं आहे.
हेमा मालिनी म्हणाल्या की, "आम्ही सगळे संसदेत जातो. तिथे बोलण्याचं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. भारताची बदनामी करण्याचं राहुल गांधी यांचं वक्तव्य पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी भारतीयांची माफी मागावी".
योगी सरकारच्या निर्णयाचं हेमा मालिनी यांच्याकडून कौतुक
योगी सरकारच्या निर्णयाचं कौतुक करत हेमा मालिनी म्हणाल्या की, "दुर्गा सप्तमीनिमित्त उत्तर प्रदेशातील मंदिरे आणि शक्तिपीठांमध्ये रामायणाचे पठण करण्याचा योगी सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे. रामायणाचं पठण करण्याचा योगी सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आहे."
हेमा मालिनी पुढे म्हणाल्या की, "महाराष्ट्र सरकारने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा'च्या निमित्ताने महाराष्ट्रातील 75 नद्या स्वच्छ करण्याचा पुढाकार घेतला आहे. त्यानिमित्ताने मी 19 मार्चला मुंबईतील एनसीपीएमध्ये 'गंगा' हे नृत्य नाट्य सादर करणार आहे."
हेमा मालिनी 'गंगा' नृत्य नाटिका सादर करणार
'गंगा' या नृत्य नाटिकेबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, "आजच्या तरुण पिढीला नद्यांशी जोडणे आणि नद्यांची काळजी घेण्यास प्रवृत्त करणे, असे उदात्त ध्येय असणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या या उदात्त उपक्रमात सहभागी होताना मला अभिमान वाटतो. 'चलीये, जानिये नदी को,' या अभियानातील माझे योगदान म्हणजे 'गंगा' हे चांगले संशोधन केलेले आणि कौशल्यपूर्ण नृत्य सादरीकरण सादर करणे. हे नृत्यनाट्य आम्हा सर्वांना आमच्या नद्यांची काळजी घेण्यासाठी आणि एकत्रित मानवी प्रयत्नांद्वारे त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी मला आशा आहे".
View this post on Instagram
हेमा मालिनी यांनी पुढे 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ऑस्कर मिळणं ही भारतासाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचं हेमा मालिनी म्हणाल्या.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी म्हणजे 75 व्या वर्षात 'आजादी का अमृत महोत्सव' म्हणून आपल्या मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि नर्तिका हेमा मालिनी 19 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता 'गंगा' ही नृत्यनाटिका एनसीपीए इथे सादर करणार आहेत.
संबंधित बातम्या