एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Health Tips : तुम्हीही ब्रेड फ्रीजमध्ये ठेवता का? ब्रेडसह या 8 गोष्टी फ्रिजमध्ये ठेवू नका

Health Tips : ब्रेडशिवाय इतर अनेक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. ज्यामुळे त्यांची चव बिघडते.

Health Tips : ब्रेडचा वापर नाश्त्याच्या पदार्थांत अगदी सहजपणे केला जातो. ब्रेडपासून, सॅंडवीच, पकोडे, ऑमलेट असे अनेक पदार्थ तयार केले जातात. लहान मुलांनाही ब्रेड खायला फार आवडते. मात्र, अनेकजण ब्रेड जास्त दिवस टिकून राहावा म्हणून तो फ्रीजमध्ये ठेवतात. तसेच, ब्रेडशिवाय इतर अनेक गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. ज्यामुळे त्यांची चव बिघडते. पण बहुतेक घरांमध्ये या गोष्टी फ्रीजमध्येच ठेवल्या जातात. 

फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत?

  • ब्रेड
  • मध
  • टोमॅटो
  • कॉफी
  • काजू
  • सरबत
  • चॉकलेट हेझलनट स्प्रेड 
  • आलं

ब्रेड फ्रीजमध्ये का ठेवू नये?

ब्रेड फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही कारण तो रूमच्या तपमानावर योग्य राहतो. यासाठीच तुम्ही किराणा दुकानात ब्रेड घेण्यासाठी जाता, तेव्हा तो रेफ्रिजरेटरमध्ये न ठेवता काउंटरवर ठेवला जातो ब्रेड फ्रिजमध्ये ठेवल्यास तो लवकर सुकतो. पिशवीत चांगला गुंडाळून ठेवला तरी त्याची नैसर्गिक चव बदलते. म्हणूनच किचनमध्ये फ्रीजच्या बाहेर ठेवा पण त्याच्या पॅकेटवर दिलेल्या तारखेच्या ब्रेड वापरल्यास तो फ्रेश राहतो. 

'या' गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणे योग्य का नाही?

मध : मध हे इतके नैसर्गिक अन्न आहे की तुम्ही ते खोलीच्या तापमानात दीर्घकाळ साठवू शकता. ते सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त एक अट असते ती म्हणजे काचेच्या भांड्यात ठेवणे. फ्रीजमध्ये ठेवल्यास ते गोठते आणि त्याची चवही बदलते.

टोमॅटो : साधारणपणे प्रत्येक घरात टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवला जातो. मात्र, असे करण्याची आवश्यकता नाही कारण यामुळे टोमॅटोची रचना आणि चव बदलू शकते. टोमॅटोची नैसर्गिक चव चाखायची असेल तर 4-5 दिवसात वापरता येईल तेवढा विकत घ्या.

कॉफी : बहुतेक घरांमध्ये कॉफी गरज नसताना फ्रीजमध्ये ठेवली जाते. कॉफी फक्त पाण्यापासून वाचवणं गरजेचं आहे. बाकी कॉफी सगळ्यांनाच आवडते. 

ड्रायफ्रूट्स : काही घरांमध्ये ड्रायफ्रूट्स एअर टाईट बॅगमध्ये पॅक करून फ्रीजमध्येही साठवले जातात. हे करण्याची गरज नाही, ते फ्रीजशिवाय बरेच महिने चांगले राहतात. जास्त काळ ताजे ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्स हवाबंद काचेच्या बरणीत ठेवा.

सरबत : उन्हाळ्यात त्याचा वापर अधिक होत असला तरी बहुतेक घरांमध्ये सरबतची बॉटल फ्रीजमध्ये ठेवली जाते. असे केल्याने ती गोठली जाते आणि त्याची चवदेखील बदलते. 

चॉकलेट हेझलनट स्प्रेड : ब्रेड, टोस्ट किंवा बन सोबत खाण्यासाठी, चॉकलेट हेझलनट स्प्रेड इत्यादी जाम, सॉस किंवा इतर पदार्थांसोबत आणा, मग ते फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. कारण ते खोलीच्या तापमानानुसार तयार केले जातात.

आलं : आलं आणल्यानंतर बहुतेक लोक ते धुवून फ्रीजमध्ये ठेवतात. पण हे करण्याची गरज नाही. कारण आलं जास्त काळ सुकत नाही आणि जेव्हा ते सुकते तेव्हा ते कोरडे आले (वाळलेल्या आल्याला कोरडे आले म्हणतात) बनते, जे तुम्ही बारीक करून किंवा फोडणी करून वापरू शकता. फ्रिजमध्ये ठेवताना आले थोड्या वेळाने त्याची चव किंवा पौष्टिक मूल्य कमी होऊ शकते.

यासोबतच हेही लक्षात ठेवा की काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्या मूळ स्वरूपात राहत नाहीत आणि त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC | तब्येतीवरून शिंदेंना टोला, सत्तास्थापनेवरून फडणवीसांनाही खडसावलंEknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Embed widget