Nagarjuna : नागार्जुनच्या बॉडीगार्डची दिव्यांग फॅनला धक्काबुक्की? दिग्दर्शक हंसल मेहतांनी चर्चांमध्ये घेतली उडी, म्हणाले 'माझ्या दिव्यांग मुलासोबतही...'
विमानतळावर नार्गार्जुनच्या एका चाहत्याला त्याच्या सुरक्षारक्षकाने धक्काबुक्की केल्याच्या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावर दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील उडी घेतली आहे.
Nagarjun Viral Video : सोमवारपासून साऊथचा सुपरस्टार नागार्जुनचा (Nagarjuna) सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. विमातळावर त्याचा एक दिव्यांग चाहता त्याला भेटण्यासाठी आला असता, त्याच्या सुरक्षारक्षकाने त्याला धक्काबुक्की केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यावरुन सोशल मीडियावर नागार्जुनला बरंच ट्रोल केलं जातंय. अर्थात यावर नागार्जुनकडून त्या घटनेवर माफी मागण्यात आली आहे. परंतु त्यामुळे नागार्जुनची सध्या बरीच नकारात्मक प्रतिमा त्याच्या चाहत्यांमध्ये निर्माण होत असल्याचं म्हटलं जातंय. पण या सगळ्यात लोकप्रिय दिग्दर्शक हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी देखील उडी घेतली आहे.
नागार्जुनच्या या व्हिडीओवर हंसल मेहता यांचा मुलगा जय मेहता याने देखील टीप्पणी केली. त्याने एक्स पोस्ट करत या सगळ्यावर भाष्य केलं. तिच पोस्ट हंसल मेहता यांनी रिट्विट करत त्यांच्या मुलाचा एक अनुभव सांगितला आहे. त्यामुळे नागार्जुनच्या अशा वागण्याचा सध्या नेटकऱ्यांना बराच राग आला असल्याचं पाहायला मिळतंय.
हंसल मेहता यांची पोस्ट काय?
हंसल मेहता यांच्या मोठ्या मुलाचा अनुभव त्यांनी सांगितला आहे. त्यांचा मोठा मुलगा पल्लवा याच्या डोळ्यांची शस्रक्रिया झाली होती. यावर बोलताना हंसल मेहताने म्हटलं की, 'माझा मोठा मुलगा पल्लवा याच्या डोळ्यांवर शस्रक्रिया झाली. त्यावेळी त्याने पहिल्यांदा जेव्हा डोळे उघडले त्यावेळी त्याने याच सुपरस्टारचा फोटो वृत्तपत्रांमध्ये पाहिला आणि त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने त्याचे पहिले डोळे उघडले तेव्हा त्याने त्याला ओळखलं. त्यामुळे त्याला भेटण्याची इच्छा होती. त्यासाठी मी या सुपरस्टारची वेळ मागत होतो. पण त्याच्याकडून किंवा त्याच्या मित्राकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. शेवटी मी प्रयत्न करणं सोडून दिलं. गेल्या काही दिवसांपासून माझ्या मुलाची संज्ञात्मक क्षमता देखील कमी झालीये, त्यामुळे आता या सगळ्याला काहीच अर्थ उरला नाहीये.'
True story. So my son Pallava is a fan of this massive star. I’d requested through his brother, his close friends at various times that meeting the star would mean the world to him. And it would be my gift to my boy. When his eyes were operated the first person he recognised in… https://t.co/7WQYqn1pg3
— Hansal Mehta (@mehtahansal) June 24, 2024
नागार्जुने मागितली माफी
नागार्जुनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याने त्याच्या सोशल मीडियावरुन तो व्हिडीओ शेअर करत त्याबद्दल माफी मागितली आहे. त्यावर त्याने म्हटलं की, या घटनेविषयी मला आता समजले. असं घडायला नको हवं होतं. मी त्या व्यक्तीची मनापासून माफी मागतो आणि भविष्यात असं पुन्हा होणार नाही, याची काळजी घेतो.
This just came to my notice … this shouldn’t have happened!!
— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) June 23, 2024
I apologise to the gentleman 🙏and will take necessary precautions that it will not happen in the future !! https://t.co/d8bsIgxfI8