एक्स्प्लोर

Gondia Shivshahi Bus Accident: बस चालकाकडून पूर्वी 7 वेळा अपघात; गोंदिया शिवशाही बस अपघात प्रकरणी मोठी माहिती, चालकावर निलंबनाची कारवाई

Gondia Shivshahi Bus Accident: शिवशाही बसला गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ 29 नोव्हेंबरला भीषण अपघात घडला होता.

Gondia Shivshahi Bus Accident: भंडारा इथून गोंदियाकडं प्रवासी घेऊन निघालेल्या शिवशाही बसला (Gondia Shivshahi Bus Accident) गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ 29 नोव्हेंबरला भीषण अपघात घडला होता. या अपघातात 11 निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारला घडली होती. या प्रकरणी आता एसटी महामंडळाच्या भंडारा विभागीय अधिकाऱ्यांनी शिवशाही बस चालक प्रणय रायपुरकर याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

विभागीय वाहतूक अधिकारी शितल शिरसाट यांनी चालक प्रणय रायपूरकर याच्या निलंबनाचा आदेश काल रात्री काढला असून सध्या चालक प्रणय रायपूरकर हा डुग्गीपार पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील आदेशाप्रमाणे हे निलंबन राहणार असून या कालावधीत सदर चालक निलंबीत कर्मचाऱ्यांच्या हजेरी पत्रावर दररोज स्वाक्षरी करणे त्याला बंधनकारक राहणार आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेला चालक प्रणय रायपूरकर याच्या हातानं यापूर्वी सात किरकोळ अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा कमी नुकसानीचे हे सात अपघात घडल्याची माहिती एसटी महामंडळाच्या एका अधिकाऱ्यानं एबीपी माझाशी बोलताना दिली.

मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत-

दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  परिवहन प्रशासनाला दिले आहेत. सध्या मृतांचा आकडा 11 वर असला तरी अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

पोलीस कर्मचारी स्मिता सुर्यवंशी यांचा दुर्दैवी मृत्यू

सदर अपघातामध्ये अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंन्सी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेली स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. आपले सासू सासरे व एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जीवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती. आपले परिवारांना भेटून स्मिता आज 29 नोव्हेंबर ला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरुन साकोलीला गेल्या आणि गोंदियाला जाण्यासाठी याच बसने जात असता हा अपघात घडल्याने स्मिताचा जागीच मृत्यू झाला.

शिवशाही बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे -

1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
   
टीप : मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde on Beed : बीडमधील तणाव कसा कमी होणार? पंकजा मुंडे म्हणाल्या..Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात याWalmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
अजित दादा धनंजय मुंडे टोळ्या चालवणारा, उघडा पडला; उपमुख्यमंत्र्यांचं थेट नाव घेत मनोज जरांगेंचा इशारा
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात?
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Embed widget