Guardian Minister of Gondia: मोठी बातमी: मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडलं; इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री, नेमकं काय घडलं?
Guardian Minister of Gondia: काही दिवसांपूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात अशी टीका केली होती.

गोंदिया: राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री (Guardian Minister of Gondia) पद सोडलं आहे. आता इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. इंद्रनील नाईक गोंदियाचे नवीन पालकमंत्री (Guardian Minister of Gondia) असणार आहेत. अजित पवार यांची वरळी येथे पार पडलेल्या जिल्हाध्याकक्षांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर येथील पक्षाच्या शिबिरात प्रफुल पटेल यांनी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाही केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला येतात अशी टीका केली होती, त्यानंतर आता या फेरबदलांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Guardian Minister of Gondia: तब्येतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्री पद सोडलं
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब पाटील यांनी काल (मंगळवारी) गोंदियाचा पालकमंत्री पद सोडलं आहे. तब्येतीचे कारण देत त्यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे. त्यानंतर आता इंद्रनील नाईक हे गोंदियाचे पालकमंत्री असणार आहेत. पालकमंत्री पद मिळवण्यासाठी अनेक जण आग्रही असतात, मात्र बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडलं आहे.
Guardian Minister of Gondia: पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे
काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पाटील यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. त्यांना सातत्याने पायाचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लांबचा प्रवास होत नाही असं कारण त्यांनी दिलं आहे. तरी नुकताच नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भव्य मेळावा पार पडला होता. त्या मेळाव्यामध्ये भाषण करताना खासदार प्रफुल पटेल यांनी विदर्भातील पालकमंत्री वेळ देत नाहीत, 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टसाठी फक्त येतात. इतर वेळी पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत असं म्हणत जोरदार टीका केली होती, त्याचबरोबर तेथील पदाधिकारी आणि नेते आहेत त्यांना सोबत घेत नाहीत अशी टीका केली होती. हीच किनार या पालकमंत्री पदाला आहे का अशी चर्चा सुरू आहे.
बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्यानंतर आता राज्यमंत्री इंद्रनील नाईक आता गोंदियाचे नवीन पालकमंत्री असतील त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. इंद्रनील नाईक विदर्भातील मंत्री आहेत. त्यांना गोंदियाला जाणं सोयीस्कर राहू शकतं. त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे अशी माहिती स्वतः अजित पवारांच्या वतीने देण्यात आली आहे. बाबासाहेब पाटील यांनी जेव्हा पालकमंत्री पदाची चाचपणी सुरू होती तेव्हा त्यांच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद मागितलं होतं. मात्र ती मागणी पूर्ण होऊ शकली नव्हती. हसन मुश्रीफ आणि बाबासाहेब पाटील यांना स्वतःचे जिल्हा न मिळल्याने त्यांचा सुरुवातीपासून नाराजीचा सूर होता. त्याच बरोबर हसन मुश्रीफ यांनी विदर्भातील एका जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडलं होतं, आता बाबासाहेब पाटील यांनी गोंदियाचं पालकमंत्री पद सोडलं आहे.



















