एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेसाठी कागदपत्रे जमवणे जीवावर बेतले; अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सध्या राज्यभरामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेकरिता कागदपत्रांची जुळवा-जुळव सुरू आहे. याच आवश्यक कागदपत्रांकरिता ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्तरावर येत असतात.

गोंदिया : राज्य सरकारच्यावतीने अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली. त्यानुसार, राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेनुसार महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे, महिला भगिनींनी कागदपत्रे जुळवण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे. महिलांसाठी घरातील कर्ते पुरुषही शासनाच्या या योजनेचा लाभ घरातील महिलांना मिळावा म्हणून प्रशासनाच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. मात्र, या योजनेच्या लाभासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव एका 43 वर्षीय व्यक्तीसाठी जीवघेणी ठरली आहे. गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाताना झालेल्या अपघातात (Accident) एकाचा मृत्यू झाला आहे.  

सध्या राज्यभरामध्ये 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेकरिता कागदपत्रांची जुळवा-जुळव सुरू आहे. याच आवश्यक कागदपत्रांकरिता ग्रामीण भागातील नागरिक तालुकास्तरावर येत असतात. अशातच लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी जाणाऱ्या एका 43 वर्षीय दुचाकीस्वाराला भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज 3 जुलै ला मोरगाव टि-पॉइंट येथील हिमालय बारजवळ घडली. घटना दुपारची 2 दरम्यानची आहे... नवीन BNS कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे...

शिवलाल लाडे (43) हे त्यांच्या पत्नीला निलज या गावातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची कागदपत्रे घेण्यासाठी तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे घेऊन गेले होते. मात्र, शिवलाल यांचेकडून घरी एक कागदपत्रं विसरल्याने ते राहिलेले कागदपत्र घेऊन अर्जुनी मोरगावकडे परत जात असताना अपघाताची भीषण घटना घडली. मोरगाव टि-पॉइंट येथे हिमालय बारसमोर वडसाहून कोहमाराकडे जाणाऱ्या एका ट्रकने शिवलाल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये, दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. जखमी शिवलाल ला ग्रामीण रुग्णालयात अर्जुनी मोरगाव येथे दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, मोरगाव अर्जुनी पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील कार्यवाही सुरू आहे. 

हेही वाचा

लाडकी बहीण योजनेत एका कुटुंबातील किती महिलांना लाभ मिळणार?; फडणवीसांचं विधिमंडळात उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Rally Hingoli : मनोज जरांगेंची शांतता रॅली कशी असेल ?ABP Majha Headlines :  10:00AM : 6 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole Bhandara Banner : नाना पटोले बनणार मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष; भंडाऱ्यात झळकले बॅनर्स9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 6 July 2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil on Chhagan Bhujbal : 'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
'शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील, मात्र...'; मनोज जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
Hathras Stampede : मला खूप दु:ख, अराजकता पसरवणाऱ्याला सोडलं जाणार नाही, हाथरस घटनेवर भोले बाबाची पहिली प्रतिक्रिया
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
नाशकात एसीबीचा ट्रिपल धमाका! महावितरण उपअभियंता, अव्वल कारकून, गटविकास अधिकारी लाच स्वीकारताना जाळ्यात
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, बहुतांश भागात पावसाचा यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Tomato Prices: टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे, शेतकऱ्यांना मोठा फायदा
Tomato Prices: टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे, शेतकऱ्यांना मोठा फायदा
नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अगदी सहज आणि झटपट भरण्यासाठी काय कराल?
नवे नियम, नव्या अटी; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अगदी सहज आणि झटपट भरण्यासाठी काय कराल?
Ravindra Waikar: मोठी बातमी! रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे
मोठी बातमी! रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे
पैसे ठेवा तयार! लवकरच येणार 'या' दमदार कंपनीचा आयपीओ
पैसे ठेवा तयार! लवकरच येणार 'या' दमदार कंपनीचा आयपीओ
Embed widget